CM Oath Ceremony: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 12 दिवसांनी मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार याचा फैसला बुधवारी (4 Dec )झाला. निकालानंतर राज्यात महायुतीच्या विजयानं आनंदोत्सव साजरा होत होता तर विरोधकांचा  EVM, फेर मतमोजणी, बॅलेट निवडणुकांच्या मुद्द्यावरून  सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू होता. अजूनही हा विरोध मावळलेला नसताना उद्धवजी पवारजी सर्वांना विनंती आहे, महाराष्ट्राच्या विकासासाठी यावं.. स्वतः देवेंद्रजी सर्वांशी बोलले आहेत.  सर्वांना शपथविधीच सरकारनं नियमानुसार निमंत्रणही दिलय असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. मी देखील विनंती करतो काँग्रेसचे नाना पटोले उद्धवजी पवार साहेब सर्वांनी यावे असे म्हणत बावनकुळे यांनीही शपथविधीचा निमंत्रण विरोधकांना दिलंय.

Continues below advertisement


5 डिसेंबरला संध्याकाळी 5.30 वाजता भाजप आमदार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे फडणवीस यांनी स्वतः फोन करून विरोधकांना निमंत्रण दिल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.


देवेंद्रजी स्वतः सर्वांशी बोलले आहेत..


महाराष्ट्राला पुन्हा एक नंबर वर आणणार असल्याचं सांगत आमच्या जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण करणार आहोत. राज्यपालांकडे शपथ कोण कोण करणार हे कळवलेला आहे. मात्र मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेत आहेत. सर्वांना सरकारने नियमानुसार निमंत्रण दिलय. देवेंद्रजी स्वतः सर्वांशी बोलले आहेत. उद्धवजी पवारजी सर्वांना विनंती आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी यावं. मीदेखील विनंती करतो काँग्रेसचे नाना पटोले, उद्धवजी पवार साहेब सर्वांनी यावे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.


संजय राऊतांना निमंत्रण?


तुम्हालाही निमंत्रण आलं आहे का? या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, राज्याच्या शिष्टाचारानुसार राज्यातील सर्व आमदारांनी खासदारांना आमंत्रण येतात, त्यानुसार आम्हालाही आलं असावं, राज्यातील आमदार खासदार यांना अशा प्रकारच्या कार्यक्रमाला बोलवण्याचे प्रथा परंपरा आहे. ती नव्या सरकारने तोडली नसावी अशी आमच्या आशा आहे. कारण दिल्लीतून आणि देशभरातून एवढे पाहुणे आणि एवढे नेते तिथे येतात. त्याच्यामुळे राज्यातील भूमिपुत्र आमदार, खासदार यांना जागा मिळते की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेवटी भूमिपुत्र हटाव अशी एक भूमिका महाराष्ट्रात भाजपने घेतली आहे, अनेक जण त्याचे बळी जाऊ शकतात, असं राऊत पुढे म्हणाले आहेत. 


आझाद मैदानावर शपथविधीची जय्यत तयारी 


मुंबईच्या आझाद मैदानात महायुतीच्या शपथविधीसाठी मुंबई पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.शपथविधी सोहळ्या दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून अडीच हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शपथविधी दरम्यान 10 पोलीस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलीस आयुक्त, 100 पोलीस निरीक्षक, 150 सहायक आणि पोलीस उपनिरीक्षकांसह 1500 हून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत.याच बरोबर सशस्र पोलीस दल,  टास्क फोर्ससह इतर सुरक्षा यंत्रणाही सज्ज असणार आहेत. या शिवाय आझाद मैदान परिसर हा नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आला असून आजू बाजूच्या उंच इमारतींवरही पोलीस तैनात असणार आहेत.शिवाय ड्रोन द्वारेही पोलिसांची करडी नजर असणार आहे.