Devendra Fadnavis: भ्रष्टाचार विरोधी लोकायुक्ताचा कायदा आम्ही करणार आहेत. हे बील याच अधिवेशनात मांडणार असल्याचं उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्याशिवाय लोकायुक्तांच्या कक्षेत आता मुख्यमंत्रीही असणार आहेत, असेही फडणवीस यांनीही यावेळी सांगितलं. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. 


अण्णा हजारे यांच्या समितीचा रिपोर्ट सरकारने स्वीकारला आहे. नवीन लोकायुक्त कायद्याला मुख्यमंत्री यांनी मजुरी दिली आहे. राज्यात पहिल्यादा मुख्यमंत्री यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणणार आहोत. मंत्रिमंडळ देखील लोकायुक्तात येईल. अँटी करप्शन ऍक्टला लोकायुक्ताचा भाग केले आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. 


मागील तीन वर्षात मुंबईत कोरोना नव्हता म्हणून अधिवेशन होत होते आणि पण नागपूरात होत नव्हते.. तीन वर्षानंतर विरोधकांना नागपुरात येण्याची संधी मिळाली. सर्वांचं मी स्वागत करतो, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी चहापाण्यावर बहिष्कार टाकला आहे. 


यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सविस्तर त्याबाबत सांगतीलच. अण्णा हजारे सातत्याने मागणी करत होते, ज्या प्रकारे केंद्रात लोकपाल विधेयक झाले तसे महाराष्ट्रात कायदा झाला पाहिजे. आम्ही महाराष्ट्रात लोकायुक्त आणणार आहोत. याच अधिवेशनात विधेयक मांडण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनाही लोकआयुक्ताच्या कक्षेत आणण्याचं काम करण्यात येणार आहे.


अण्णा हजारे यांच्या समितीचा रिपोर्ट सरकारने स्वीकारला आहे. नवीन लोकायुक्त कायद्याला मुख्यमंत्री यांनी मजुरी दिली आहे. राज्यात पहिल्यादा मुख्यमंत्री यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणणार आहोत. मंत्रिमंडळ देखील लोकायुक्तात येईल. अँटी करप्शन ऍक्टला लोकायुक्ताचा भाग केले आहे. पाच जणांची समिती केली दोन जणांचा बेंच असणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सहा महिन्यात काय केलं विरोधक विचारत असताता. आम्ही 6 महिन्याच्या काळात भ्रष्टाचार विरोधी कायदा केला आहे. याच अधिवेशनात लोकायुक्ताचं बील मांडणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.


सीमावादावर बोलताना फडणवीस म्हणाले की, सीमावादाचा मुद्दा पहिलांदाच उठला नाही. याआधीही अनेकदा यावर संघर्ष झालाय. पण आता त्याला जास्त हवा दिली जात आहे. कोणी म्हणाले आम्हाला गुजरातला जायचं आहे, कोणी म्हणाले कर्नाटकात जायचं आहे, हे कोणी भडकवलं याबाबत माहिती आम्हाला मिळाली आहे. आम्ही ती माहिती सभागृहात देणार आहेत. काही पक्षाचे लोक बैठका घेत आहेत. अजित दादांना माहीत नसेल तर त्यांची नावे आम्ही देऊ, असे फडणवीस म्हणाले.