Chandrapur Election 2026 चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या जोरगेवर (Kishor Jorgewar) आणि मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचा वाद अगदी संघर्षाला गेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महानगरपालिका निवडणुकीत (Chandrapur Municipal Election 2026) या दोन नेत्यांमधला संघर्षाचा नवीन अध्याय पाहायला मिळाला आहे. मुनगंटीवार आणि जोरगेवार या दोन नेत्यांनी महानगरपालिका निवडणुकीत अगदी इच्छुक उमेदवारांच्या फॉर्म वाटपापासून ते एबी फॉर्म वाटपापर्यंत गटबाजीचं प्रदर्शन केलंय. त्यामुळे भाजपचे उमेदवार आणि समर्थक संभ्रमात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज रविवारी (4 जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा चंद्रपूर महानगरपालिकेसाठी (Chandrapur Election 2026) प्रचार दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे फडणवीस या 2 नेत्यांमधला विसंवाद संपवतील का? हा खरा प्रश्न आहे.
Devendra Fadnavis in Chandrapur : असा असेल मुख्यमंत्र्यांचा चंद्रपूर दौरा
चंद्रपूर महानगर पालिकेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज चंद्रपूर दौरा असणार आहे. सकाळी 9:30 वाजता महाकाली मंदिर येथे ते दर्शन घेतील. त्यानंतर अंचलेश्वर मंदिर ते जटपुरा गेट असा त्यांचा जवळपास दीड तासांचा रोड शो आहे.
Chandrashekhar Bawankule: 51% मतांसह चंद्रपूर महापालिका जिंकणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन
चंद्रपूर भाजपमधील वादानंतर आज चंद्रपुरात होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या रोड शो संदर्भात आणि भाजपा शिवसेना महायुतीच्या समन्वयासंदर्भात शनिवारी एक महत्त्वपूर्ण बैठक चंद्रपुरात पार पडली. राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे राज्य निवडणूक समन्वयक चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार हंसराज अहिर, पक्षनिरीक्षक चैनसुख संचेती, अशोक नेते , पालकमंत्री अशोक उईके आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सर्वच उमेदवारांना प्रचाराच्या संपूर्ण काळात घ्यावयाची काळजी व प्रचारासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांनी मतभेद विसरून 51% मतांसह चंद्रपूर मनपात भाजपचा महापौर बनविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
Chandrapur Election 2026 : जोरगेवार-मुनगंटीवार वादाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतील रंगलं राजकीय नाट्य
- चंद्रपूर महानगरपालिकेच्या 66 नगरसेवकांच्या उमेदवारीसाठी काल (मंगळवारी) सकाळी चंद्रपूर शहरातील एनडी हॉटेल येथे भाजपचे चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती, निवडणूक प्रभारी अशोक नेते सकाळपासून ठाण मांडून बसले होते आणि सर्व भाजपचे कार्यकर्ते वाट पाहत होते, ती निवडणूक प्रमुख किशोर जोरगेवार यांची.
-त्यानंतर जवळपास 11 वाजता भाजप आमदार किशोर जोरगेवार नागपूरहून चंद्रपूरच्या या हॉटेलमध्ये आपल्या ताफ्यासह दाखल झाले आणि त्यांनी अचानक मीडियासमोर उमेदवारी यादी माझ्या हातात आहे आणि या यादीतील दोन नावांवर माझा तीव्र आक्षेप आहे, अशी जाहीर घोषणा केली.
-त्यानंतर जोरगेवार हॉटेलमध्ये गेले आणि त्या ठिकाणी चैनसुख संचेती आणि अशोक नेते यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू झाली. दुपारचे 1 वाजले तरीही भाजपच्या एकाही उमेदवाराच्या हातात एबी फॉर्म पडला नव्हता, कार्यकर्ते बाहेर बेचैन होते.
-हॉटेलच्या आत मध्ये किशोर जोरगेवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांचे भाजपच्या श्रेष्ठींना तातडीने फोन सुरू होते... भाजपच्या यादीमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या 2 समर्थकांच्या नावांवर जोरगेवार यांना तीव्र आक्षेप होता
-अजय सरकार आणि पूजा पोतराजे या मुनगंटीवार समर्थकांच्या नावांवर हा आक्षेप होता, अजय सरकार यांच्यावर 302 सहित 20 गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांना उमेदवारी का द्यावी असा जोरगेवार यांचा आक्षेप होता तर पूजा पोतराजे यांचे पती मनोज पोतराजे यांनी गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात समाज माध्यमांवर अतिशय खालच्या भाषेत टीका केली होती, मग त्यांना उमेदवारी का असा जोरगेवार यांचा सवाल होता
- अखेर जा उमेदवारांच्या नावावर आक्षेप नव्हता त्या सर्वांचे हळूहळू एबी फॉर्म देण्यात आले आणि शेवटी या भांडणाला कंटाळून निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती दोन फॉर्म घेऊन हॉटेलच्या बाहेर निघून गेले
-अखेर जोरगेवार यांचा काही प्रमाणात विजय झाला आणि पक्षाने अजय सरकार यांची उमेदवारी कापून रॉबिन बिश्वास यांना उमेदवारी दिली तर पूजा पोतराजे यांच्यासोबत चंद्रकला सोयाम यांना देखील एबी फॉर्म देऊन हा वाद शमवला.
आणखी वाचा