Devendra Fadnavis :  काहींनी घरात बसून मुलाखत दिली. पण ही घरच्यांनी घरच्यांसाठी केलेली आणि घेतलेली मुलाखत आहे. काहींनी तर टीव्ही देखील बंद केला असेल असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती कन्फ्यूज आणि भ्रष्टाचाराची युती असल्याची टीका फडणवीसांनी केली. संपादक संजय राऊत यांनी बरोबर ओळखलं उद्धव ठाकरेंना विचारलं भ्रष्टाचारी म्हंटलं आणि राज ठाकरेंना कन्फ्यूज म्हंटलं असे फडणवीस म्हणाले.  

Continues below advertisement

 मुंबईत जन्माला आले म्हणून फुलं आणि हार घालायचे का?

जन्माने मुंबईकर नाही म्हणून यांना माहिती, बाहेरुन आलेले आहेत असं ठाकरे म्हणाले. त्यांचा जन्म पुण्यात झाला होता. बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईकरांची नाडी, संकल्पना चांगली माहिती होती असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ज्यांचा जन्म मुंबईत झाला ते आता म्हातारे होतायत, मात्र मुंबईसाठी काय केलं हे ते दाखवू शकत नाही अशी टीका देखील फडणवीसांनी केली. मुंबईत जन्माला आले म्हणून फुलं आणि हार घालायचे का? असा सवाल देखील मुख्यमंत्र्यांनी केला. 10 वर्षात आपल्या सरकारने बदल करुन दाखवला, मात्र यांच्याकडे काहीच नाही. ठाकरेंनी एक काम सांगावं विकासाचं. मी आता दोन हजार रुपये त्यांना देतो, आधी रिस्पॉन्स आला नव्हता म्हणून हजार वाढवले, चला 3 हजार रुपये देतो असे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईतील गरीबाला वसई विरार पलिकडे का जावं लागलं? असा सवाल फडणवीसांनी केला. 

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरु आहे. कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या सोबतीला शरद पवार यांच्या पक्षाची देखील साथ मिळाली आहे. तर त्यांना भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं आव्हान दिलं आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मुंबऊत एकनाथ शिंदे च्या यांच्या शिवसेनेने भाजपला साथ दिली आहे. तर अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. सर्वच राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. त्यामुळं सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष झालाय, नाशिकमधून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, फडणवीसांवरही टीका