एक्स्प्लोर

Delhi BJP CM Face Delhi Election Result 2025: 27 वर्षांआधी पाच वर्षांत 3 मुख्यमंत्री; दिल्लीत भाजपकडून मुख्यमंत्री कोण?, 3 नावं चर्चेत

Delhi BJP CM Face Delhi Election Result 2025: 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते. जर भाजपला बहुमत मिळाले तर ते 27 वर्षांनी पुन्हा सत्तेत येतील.

Delhi BJP CM Face Delhi Election Result 2025: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा पराभव झाला आहे. नवी विधानसभा मतदारसंघातून आपचे अरविंद केजरवील आणि भाजपच्या परवेश वर्मा (Parvesh Verma) यांच्यात लढत झाली होती. यामध्ये परवेश वर्मा यांनी 1844 मतांनी विजयी मिळवला आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याकडून दिल्ली (Delhi Election Result 2025) निसटल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिल्ली विधानसभा निवडणुकांत 60 च्या वर जागा जिंकणारी आम आदमी पार्टी सध्या 30 पेक्षा कमी जागी आघाडीवर आहे. तर भाजप 40 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते. जर भाजपला बहुमत मिळाले तर ते 27 वर्षांनी पुन्हा सत्तेत येतील. यापूर्वी 1993 मध्ये भाजपने 49 जागा जिंकल्या होत्या आणि 5 वर्षांत 3 मुख्यमंत्री बनवले होते. यामध्ये मदनलाल खुराणा, साहिब सिंग वर्मा आणि सुषमा स्वराज यांचा समावेश होता. तिन्ही नेत्यांचे मुलं आणि मुली दिल्लीच्या राजकारणात सक्रिय आहेत. खुराणा यांचे पुत्र हरीश खुराणा मोती नगर येथून निवडणूक लढवत आहेत, तर साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र परवेश वर्मा नवी दिल्ली येथून निवडणूक लढवत आहेत. तर सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज या नवी दिल्लीच्या खासदार आहेत.भाजपाला बहुमत मिळाल्यास दिल्लीत मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असणार, याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे.  सध्या राजकीय वर्तुळात परवेश वर्मा, रमेश बिधुरी आणि दुष्यंत गौतम यांची नावे मुख्यमंत्रि‍पदासाठी आघाडीवर आहेत.

कोण आहे परवेश वर्मा? 

आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपकडून परवेश वर्मा (Parvesh Verma) यांना उमेदवारी देण्यात आली होती. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून परवेश वर्मा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. याशिवाय, प्रवेश वर्मा हे जाट समुदायातून येतात, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून दिल्ली आणि हरियाणातील जाट मतदारांना आकर्षित करणे भारतीय जनता पक्षाला सोपे जाईल. परवेश वर्मा म्हणाले की, दिल्लीतील जाट नेते, बंधू आणि भगिनी भाजपसोबत आहेत. दिल्लीचा विकास फक्त भाजपच करू शकते. जाट आरक्षणाचा प्रश्न आहे, त्यासाठी राज्य सरकारला सभागृहातून कायदा करून केंद्राकडे पाठवावा लागेल, जे त्यांनी कधीही केले नाही. अरविंद केजरीवाल सतत खोटे बोलत आहेत, असा आरोप परवेश वर्मा यांनी केला आहे. 

रमेश बिधुरी यांचं नावही मुख्यमंत्रि‍पदासाठी आघाडीवर-

दिल्लीतील मुख्यमंत्रि‍पदासाठी रमेश बिधुरी यांचं नावही आघाडीवर आहे. गुज्जर समुदायातून आलेले रमेश बिधुरी यांचे त्यांच्या लोकांमध्ये एक विशेष स्थान आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात भाजपाने उमेदवारीही दिली होती. दिल्ली निवडणूक प्रचारादरम्यान, रमेश बिधुरी त्यांच्या विधानांमुळे खूप चर्चेत राहिले आहेत. दिल्लीतील कालकाजी मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल बोलताना, जसे आम्ही ओखला आणि संगम विहारमधील रस्ते केले आहेत, तसेच आम्ही कालकाजीतील सर्व रस्ते प्रियांका गांधी यांच्या गालासारखे गुळगुळीत करू, असं बिधुरी म्हणाले होते. 

दुष्यंत गौतम यांचं नावही चर्चेत-

दिल्लीतील करोल बाग येथील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दुष्यंत कुमार गौतम हे देखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहे. राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,  दुष्यंत कुमार गौतम यांना दिल्लीचे मुख्यमंत्री करुन भाजपा सर्वांना धक्का देऊ शकतो. अनुसूचित जातीचे मतदार आणि बिहारमधील आगामी निवडणुका लक्षात घेऊन दुष्यंत कुमार गौतम यांना मुख्यमंत्रिपद दिले जाऊ शकते. अनुसूचित जातीचे मतदार आणि बिहारमधील आगामी निवडणुका लक्षात घेऊन त्यांना हे पद दिले जाऊ शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की भाजप दिल्लीतून बिहारला आकर्षित करण्याचा प्रयत्न करू शकते. याशिवाय, भाजपकडे अनुसूचित जातीचा मुख्यमंत्री नसल्याने, दुष्यंत कुमार गौतम यांना भाजपकडून मुख्यमंत्रि‍पदी संधी दिली जाऊ शकते.

संबंधित बातमी:

Anna Hazare On Arvind Kejriwal: दिल्लीत आम आदमी पार्टीला धक्का; अरविंद केजरीवालांच्या गुरुची मार्मिक प्रतिक्रिया, अण्णा हजारे म्हणाले....

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'जन गण मन'च्या आधी वंदे मातरम वाजवणार; 3 मिनिटे 10 सेकंदांच्या राष्ट्रगीतादरम्यान उभं राहणं आवश्यक; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
'जन गण मन'च्या आधी वंदे मातरम वाजवणार; 3 मिनिटे 10 सेकंदांच्या राष्ट्रगीतादरम्यान उभं राहणं आवश्यक; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
Pune Crime Budhwar Peth: पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut: चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai News: पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मठेपेची शिक्षा अन्..., गांधीजींचा अभ्यासामुळं तुरुंगवासात कोर्टानेच केली कपात… नेमकं प्रकरण काय ?
पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मठेपेची शिक्षा अन्..., गांधीजींचा अभ्यासामुळं तुरुंगवासात कोर्टानेच केली कपात… नेमकं प्रकरण काय ?

व्हिडीओ

Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report
Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जन गण मन'च्या आधी वंदे मातरम वाजवणार; 3 मिनिटे 10 सेकंदांच्या राष्ट्रगीतादरम्यान उभं राहणं आवश्यक; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
'जन गण मन'च्या आधी वंदे मातरम वाजवणार; 3 मिनिटे 10 सेकंदांच्या राष्ट्रगीतादरम्यान उभं राहणं आवश्यक; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
Pune Crime Budhwar Peth: पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री 12 वाजता पोलिसांचा प्रचंड फौजफाटा पोहोचला, कुंटणखान्यातील खोल्यांची झडती, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut: चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai News: पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मठेपेची शिक्षा अन्..., गांधीजींचा अभ्यासामुळं तुरुंगवासात कोर्टानेच केली कपात… नेमकं प्रकरण काय ?
पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मठेपेची शिक्षा अन्..., गांधीजींचा अभ्यासामुळं तुरुंगवासात कोर्टानेच केली कपात… नेमकं प्रकरण काय ?
BMC Mumbai standing Committee: मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राजवटीत महत्त्वाचा नियम बदलण्याच्या हालचाली; नगरसेवक, स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा?
मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राजवटीत महत्त्वाचा नियम बदलण्याच्या हालचाली; नगरसेवक, स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा?
कट रचून माझं गर्भाशय काढलं अन्…; बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायकाच्या पहिल्या पत्नीचे खळबळजनक आरोप
कट रचून माझं गर्भाशय काढलं अन्…; बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायकाच्या पहिल्या पत्नीचे खळबळजनक आरोप
Nagpur Crime : घरात कुणी नसताना भेटायला बोलावलं, दोन अल्पवयीन मित्रासह ओळखीच्या तरुणांचं नको ते कृत्य; घटनेनं नागपूर हादरलं!
घरात कुणी नसताना भेटायला बोलावलं, दोन अल्पवयीन मित्रासह ओळखीच्या तरुणाचं नको ते कृत्य; घटनेनं नागपूर हादरलं!
Relatinship Tips : 'व्हॅलेंटाईन डे' ला वाढवा तुमच्या नात्यातील गोडवा! नातं सुधारण्यासाठी करा 'हे' ज्योतिषीय उपाय
'व्हॅलेंटाईन डे' ला वाढवा तुमच्या नात्यातील गोडवा! नातं सुधारण्यासाठी करा 'हे' ज्योतिषीय उपाय
Embed widget