एक्स्प्लोर

Delhi Election Result 2025 : दिल्लीत भाजपची मुसंडी, 'आप'ला मोठा झटका, अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'अहंकार आणि अराजकतेचा...'

Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता यावर अमित शाह यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (दि. 08) सकाळी आठ वाजेपासून सुरु झाली आहे. दिल्लीत एकूण 70 विधानसभेच्या जागा असून भाजपने (BJP) सध्या ट्रेंडनुसार मोठी मुसंडी मारली आहे. भाजप 48 जागांवर आघाडीवर असून स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर आम आदमी पार्टीला दिल्लीत मोठा धक्का बसला आहे.  आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांचा पराभव झाला आहे. आप 22 जागांवर आघाडीवर असून काँग्रेसला एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही. आता दिल्लीच्या निकालावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे.     

अमित शाह यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले आहे की,  वारंवार खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करता येणार नाही, असे दिल्लीतील जनतेने सांगितले आहे. गलिच्छ यमुना, पिण्याचे अस्वच्छ पाणी, तुटलेले रस्ते, तुंबलेली गटारे आणि प्रत्येक रस्त्यावर उघडलेली दारूची दुकाने यांना जनतेने त्यांच्या मतांनी प्रतिसाद दिला आहे, असे म्हणत त्यांनी आम आदमी पार्टीसह अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधलाय.

अहंकार आणि अराजकतेचा पराभव

दिल्लीतील खोट्या सरकारचे राज्य संपले. हा अहंकार आणि अराजकतेचा पराभव आहे. हा दिल्लीकरांच्या 'मोदींवरील विश्वासाचा आणि मोदींच्या विकासाच्या व्हिजनचा विजय आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली, भाजपने आपली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा आणि दिल्लीला जगातील नंबर 1 राजधानी बनविण्याचा निर्धार केला असल्याचे देखील अमित शाह यांनी म्हटले आहे. लबाडी, फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा 'शीशमहल' नष्ट करून दिल्लीला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याचे काम दिल्लीच्या जनतेने केले आहे. आश्वासने मोडणाऱ्यांना दिल्लीने असा धडा शिकवला आहे, अशी टीका देखील अमित शाह यांनी केली आहे.

दिल्ली आता आदर्श राजधानी बनेल

अमित शाह यांनी पुढे म्हटले आहे की,  महिलांचा आदर असो, अनधिकृत वसाहतीतील रहिवाशांचा स्वाभिमान असो किंवा स्वयंरोजगाराच्या अफाट शक्यता असो, दिल्ली आता मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक आदर्श राजधानी बनेल, असे म्हणत त्यांनी दिल्लीतील विजयासाठी काम केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. 

आणखी वाचा 

इंडिया आघाडीनेच खंजीर खुपसला, अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाचं नेमकं कारण समोर; 'त्या' 4 हजार मतांनी केला गेम!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर

व्हिडीओ

Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
जय शिवराय... युनोस्कोकडून महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र, फ्रान्समधील कार्यालयात मिळालं
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
Embed widget