एक्स्प्लोर

Bhiwandi : भिवंडी महापालिकेत महापौर पदासाठी सेक्युलर पक्षांची एकजूट, ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ स्थापन, महापौरपदावर काँग्रेसचा दावा 

Bhiwandi Municipal Corporation : भिवंडी महापालिकेत काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी एकत्र येत भिवंडी सेक्युलर फ्रंट स्थापन केला आहे.

भिवंडी: भिवंडी महानगरपालिका निवडणुकीनंतर महापौर पदाच्या निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, सेक्युलर विचारधारेच्या पक्षांनी एकत्र येत “भिवंडी सेक्युलर फ्रंट” या संयुक्त मंचाची स्थापना केली आहे. महापौर पदासाठी आवश्यक असलेला बहुमताचा 46 चा आकडा गाठण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि समाजवादी पक्ष यांनी ही महत्त्वपूर्ण राजकीय आघाडी उभारली आहे.

महापालिका निवडणुकीत काँग्रेस पार्टीने सर्वाधिक 30 जागा मिळवल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला 12 जागा आणि समाजवादी पार्टीला 6 जागा मिळाल्या आहेत. या तिन्ही सेक्युलर पक्षांची एकत्रित संख्या 48 होत असून, त्यामुळे महापौर पदासाठी आवश्यक बहुमत सहजपणे पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर, महापौर पदावर सेक्युलर विचारांचा प्रतिनिधी बसवण्यासाठी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ची घोषणा केली आहे. 

भिवंडी निजामपूरचा महापौर हा काँग्रेस पक्षाचाच होणार असल्याचे दावा करण्यात आला आहे. तर 48 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत असेही स्पष्ट केले आहे. दरम्यान महापालिकेत 100 वर्षापासून सुरू असलेली परंपरा म्हणजे हिंदु मुस्लिम असा महापौर व उप महापौर करण्याचा प्रयत्न काँग्रेस कडून करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेस भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष व भिवंडी सेक्युलर फ्रंट अध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. भिवंडी सेक्युलर फ्रंटचे कोऑर्डिनेटर म्हणून आमदार रईस शेख यांची निवड करण्यात आली आहे. सर्वात मोठा पक्ष काँग्रेस असल्यानं काँग्रेसचा महापौर होईल असं रशीद मोमीन म्हणाले. तीन पक्षांचे मिळून  48 नगरसेवक होतात. भाजपचा दावा निराधार असून त्यात सत्य नाही, असं रशीद ताहीर मोमीन म्हणाले.  

भिवंडीत  काँग्रेस शहराध्यक्ष माजी आमदार रशीद ताहीर मोमीन,समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शोएब खान ( गुड्डू ) यांच्या नेतृत्वाखाली या फ्रंटची स्थापना करण्यात आली आहे.यामध्ये फ्रंटचे अध्यक्ष काँग्रेस अध्यक्ष रशीद ताहीर असणार आहेत तर आमदार रईस शेख कोऑर्डिनेटर तर शोएब खान ( गुड्डू ) आणि अजय यादव कोकॉर्डिनेटर असतील. या वेळी समाजवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अजय यादव,समाजवादी पक्षाचे निरीक्षक कुबेर मोर्या व फारुख कुरेशी उपस्थित होते.

भिवंडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि समाजवादी पक्ष या सेक्युलर विचारधारेच्या पक्षाला भिवंडीत विजय मिळाला आहे.शहरातील जनतेने सेक्युलर विचारधारेला विजयी केल्या मुळे आता आमची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे शहरातील सर्व समाजाला न्याय देण्यासाठी सर्वधर्म समभाव या विचारधारेतून सर्व पक्षांच्या वरिष्ठांच्या मान्यतेने भिवंडी सेक्युलर फ्रंट ची स्थापना करण्यात येत आहे.ज्या माध्यमातून शहरातील विकासाला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन आमदार रईस शेख यांनी केले आहे.

भिवंडी निजामपूर पक्षीय बलाबल 

काँग्रेस -  30
समाजवादी पक्ष -  6
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (शप)- 12
भाजपा   -  22
शिवसेना (शिंदे) -  12
कोणार्क विकास आघाडी -  4
भिवंडी विकास आघाडी - 3
अपक्ष -1

एकूण जागा : 90  बहुमत : 46

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका
'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका
Narhari Zirval: मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
Maharashtra ATS Action: राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं कारण काय?
राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं कारण काय?
India Vs Pakistan: टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे 6 धुरंदर आज पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज थरार प्रत्यक्ष मैदानात अनुभवणार!
टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे 6 धुरंदर आज पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज थरार प्रत्यक्ष मैदानात अनुभवणार!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : पाकिस्तान टिपू सुलतानाला हिरो मानतं तर त्यांच्यासोबत क्रिकेट कसं खेळू शकता
Raghuvir Khedkar Majha Katta: डीजे,लावण्यांचं आक्रमण तमाशाच्या मुळावर? रघुवीर खेडकरांचा 'माझा कट्टा'
Jayant patil on Ajit pawar : माझी आणि दादा यांची 11 वेळा भेट झाली होती, विलिनीकरणावर जयंत पाटील काय म्हणाले?
Harshwardhan Sakpal vs Devendra Fadnavis on Tipu Sultan : टिपू सुलतानवरुन टीकेची तलवार
Dombivli Fire: डोंबिवलीत पहाटे भीषण आग, बेसमेंट पार्किंगमध्ये 29 दुचाकी जळून खाक; पाच जण जखमी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका
'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका
Narhari Zirval: मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
Maharashtra ATS Action: राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं कारण काय?
राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं कारण काय?
India Vs Pakistan: टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे 6 धुरंदर आज पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज थरार प्रत्यक्ष मैदानात अनुभवणार!
टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे 6 धुरंदर आज पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज थरार प्रत्यक्ष मैदानात अनुभवणार!
India Vs Pakistan: वेगवान गोलंदाजीत फक्त बुमराह, टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग 11 कशी असणार? कोलंबोची एकंदरीत परिस्थिती पाहता कोणाचा पत्ता ऐनवेळी कट होणार??
वेगवान गोलंदाजीत फक्त बुमराह, टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग 11 कशी असणार? कोलंबोची एकंदरीत परिस्थिती पाहता कोणाचा पत्ता ऐनवेळी कट होणार??
Suryakumar Yadav on Usman Tariq: कॅप्टन सूर्याकडून पाकिस्तानच्या उस्मान तारिकच्या भलत्याच अ‍ॅक्शनची कॉपी; म्हणाला 'हा आमच्या 'अभ्यासक्रमाबाहेर' पण टीम इंडिया त्याला...'
Video: कॅप्टन सूर्याकडून पाकिस्तानच्या उस्मान तारिकच्या भलत्याच अ‍ॅक्शनची कॉपी; म्हणाला 'हा आमच्या 'अभ्यासक्रमाबाहेर' पण टीम इंडिया त्याला...'
Dharashiv ZP: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला; शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव, फडणवीस-शिंदे आजच निर्णय घेणार?
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला; शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव, फडणवीस-शिंदे आजच निर्णय घेणार?
Narhari Zirwal NCP: नरहरी झिरवळ अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेस कोंडीत, सुनेत्रा पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक
नरहरी झिरवळ अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेस कोंडीत, सुनेत्रा पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक
Embed widget