Nagpur Municipal Corporation Election 2026 :राज्यातल्या 29 महानगरपालिकांसाठी आज मतदानाची (Maharashtra Municipal Election 2026) रणधुमाळी पार पडते आहे. सकाळी साडेसात ते साडेपाच दरम्यान नागरिकांना मतदान करता येणार आहे. अशातचनागपुरातून (Nagpur)एकधक्कादायकबातमीसमोरआलीआहे. शहरातील प्रभाग 31 मधील काँग्रेसच्या कार्यालयालाअचानकआगलागल्याचीघटनाघडलीय. याआगीत प्रभाग 31 मधील काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी (Shivani Chaudhary) यांच्या कार्यालयाबाहेरील पेंडोल, पडदे आणि पक्षाचे झेंडे जळाले आहे. (Nagpur Municipal Corporation Election 2026)

मात्र, हेकार्यालयजाळलेकिजाळलेअसासंशयकाँग्रेसकडूनउपस्थितकरण्यातयेतोय. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांवर आरोप करत कार्यालय बाहेरील पेंडॉल, पडदे आणि पक्षाचे झेंडे जाळण्यात आल्याचा आरोप केला आहे.

Pravin Datke : कार्यालय जळाले की काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वतः जाळलं, याबाबत शंका

एकीकडेमतदानाचीरणधुमाळीसुरुअसतानायाआगीच्याघटनेनेशहरातीलराजकारणतापल्याचेबघायलामिळालंय. काँग्रेसचे कार्यालय जळाले की काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वतः जाळलं याबद्दल आमच्या मनात शंका आहे. पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी. प्रभाग 11 मध्ये काल रात्री भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांना ज्या पद्धतीने शंभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केली की अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि अशी मारहाण करणे हिंसा करणे काँग्रेसची संस्कृती आहे. असा पलटवारभाजपआमदारप्रवीण दटकेयांनीकेलाआहे.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना नागपूरच्या जुनी शुक्रवारी परिसरातील काँग्रेसच्या कार्यालयाला आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही आग जाणून-बुजून लावण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. मात्र, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

प्रभाग क्रमांक ३१ मधील शिवानी चौधरी यांच्या निवडणुकीसाठी हे कार्यालय तयार करण्यात आले होते. कार्यालयातील गाद्या, कापड आणि कार्पेटला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कार्यालयाचा बराचसा भाग जळून खाक झाला आहे. नागपूर पोलिसांनी महावितरण आणि अग्निशमन विभागाला पाचारण केले असून आगीच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.

Nagpur Municipal Corporation Election 2026 : मनपा प्रशासनाद्वारे दिव्यांग मतदारांकारिता विशेष सोय

नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. याप्रक्रीयेत दिव्यांग मतदारांना सहभाग नोंदविता यावा करिता मनपा प्रशासनाद्वारे दिव्यांग मतदारांकारिता विशेष सोय करण्यात आली आहे. लोकेशन शेअर केल्यानंतर मतदान बूथ वर ये-जा करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये घरून मतदान करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र या निवडणूकित कुठलीही व्यवस्था नसल्याने मतदानाचा टक्का वाढावा याकरिता नागपूर पालिका प्रशासनाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना बूथपर्यंत ये जा करण्याकरिता वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. व्हाट्सअप क्रमांक निर्गमित करण्यात आला असून त्या व्हाट्सअप क्रमांकावर कॉल करून लोकेशन शेअर केल्यावर प्रशासनाकडून वाहनाची व्यवस्था केली जात आहे.