ठाणे: राज्यातील दोन नगरपालिकांमध्ये भाजपने (BJP) चक्क काँग्रेस आणि एमआयएमसोबत युती केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनाही सवाल करण्यात येत आहेत. त्यावरुन, अशी युती आम्हाला मान्य नाही, या स्थानिक पातळीवर झालेल्या घडामोडी आहेत. त्यामुळे, संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराच देवेंद्रफडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला. त्यानंतर, आता अंबरनाथमधील भाजप नेते तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. अंबरनाथ-बदलापूरमध्ये (Ambernath) भाजप शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवले आहेत, त्यामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीच्या हातात आली अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षतेजश्रीकरंजुळे सुशिक्षित असून त्यांना काँग्रेसने समर्थन दिले आहे, ही युती नाही, असे पवार यांनी सांगितले.
काँग्रेस आणि इतर घटकांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे, अंबरनाथमध्ये विकास होण्याच्या दृष्टिकोनातून विकासाची काम जी रखडले आहेत त्याला गती देण्यासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टीला समर्थन दिल्याचा हा प्रकार आहे, ही युती झालेली नाही, असे नरेंद्र पाटील यांनी म्हटले. काँग्रेसकडे आम्ही पाठिंबा मागितलेला नाही, त्यांनी आम्हाला समर्थन दिलेले आहे. आमच्या सोबत या, आम्हाला मदत करा अशी कुठलीही मागणी भाजपने केलेली नाही. अंबरनाथमध्ये आधीची सत्ता शिवसेनेची होती, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर येथील जनता नाराज होती. त्या नाराजीतून नवीन पर्याय शोधावा म्हणून भारतीय जनता पार्टी हा चांगला सक्षम पर्याय अंबरनाथच्या जनतेने निवडला आहे.
जनतेने शिवसेनेला नाकारल्यामुळे आज तिथे भाजपाची सत्ता आलेली आहे, त्यांना समर्थन लोकांनी दिलेले आहे. भाजपने शिवसेनेला विरोधी पक्ष केला असे म्हणता येणार नाही, ज्यांनी भाजपला समर्थन दिले ते विकासासाठी दिले आहे, तेही विना अटी-शर्तीवर हे समर्थन आहे, असे नरेंद्र पवार यांनी म्हटले. तसेच, लोकप्रतिनिधी आणि पक्षाची बांधिलकी ही जनतेशी असते, विकासाच्या कामाशी असते, आमचे जे विरोधक आहेत त्यांना जर वाटत असेल भाजपला समर्थन दिल्याने विकास होणार आहे, तर त्यात गैर काय आहे. काँग्रेसला कुठलंही पद देत नसून त्यांना सत्तेतला वाटा देत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाचा आदेश आम्हाला बंधनकारक - पवार
स्थानिक पक्षांची युती करायची किंवा नाही करायची, याबाबतभाजपने केंद्र आणि राज्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांना तशी मुभा दिलेली आहे. अकोला जिल्ह्यात जी युती झालेली आहे, त्या संदर्भात मला माहिती नाही. वरिष्ठ पातळीवर देखील अशा युतींना परवानगी कोणी देईल असे मला वाटत नाही. अंबरनाथ युती संदर्भात मला माहिती नव्हती, मीडियाच्या माध्यमातून मला माहिती मिळालेली आहे. मी माहिती घेतल्यानंतर मला असे समजले की विना अटी-शर्तीवर समर्थन दिले आहे. वरिष्ठांनीसांगितले असेल तर त्यांचा पाठिंबा घेतला जाणार नाही. पक्षश्रेष्ठीचा जो आदेश असेल तो अकोट-अंबरनाथसाठी लागू असणार, मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्वांचा निर्णय आम्हाला बंधनकारक आहे, असेही नरेंद्र पवार यांनी म्हटले.
