Chhatrapati Sambhajinagar MC Election News: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आधी घेण्याचं निवडणूक आयोगाचं नियोजन आहे.  राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजलंय.  राज्यात नुकत्याच नगरपालिका नगरपंचायत यांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची घोषणा केली. राज्यातील 29 महापालिका संदर्भातही घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केली आहे. 

Continues below advertisement

मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. 16 जानेवारी रोजी निकालाचा गुलाल उधळला जाणार आहे. यात मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यातील 5 महानगरपालिकांसाठी निवडणूका होत असून छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, नांदेड- वाघाळा आणि लातूर महापालिकांसाठी आज घोषणा झाली.

राज्यात महापालिका निवडणुकांसाठी एकूण 3.48 कोटी मतदार आहेत. 39 हजार 147 मतदान केंद्र असणार आहेत. मराठवाड्यातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेकडे पाहिलं जात आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील सदस्य संख्या 113 एवढी असून त्या पाठोपाठ नांदेड वाघाळा महापालिका 81, लातूर 70 आणि परभणी 65 सदस्य संख्या आहे. 

Continues below advertisement

कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम? 

अर्ज दाखल करण्याची मुदत - 23 ते 30 डिसेंबर 2025 अर्जाची छाननी - 31 डिसेंबर 2025 उमेदवारी माघारीची मुदत - 2 जानेवारी 2026 निवडणूक चिन्ह वाटप, अंतिम उमेदवार यादी - 3 जानेवारी 2026 मतदान दिनांक: 15 जानेवारी 2026 मतमोजणी :16 जानेवारी 2026

छत्रपती संभाजीनगरचे पक्षीय बलाबल कसे? 

एकूण जागा: 113शिवसेना: 29भारतीय जनता पक्ष - 22MIM- 25 काँग्रेस - 10राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 03बहुजन समाज पक्ष - 05इतर/अपक्ष - 19

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एकूण 113 सदस्यांपैकी 58 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. इतर मागास प्रवर्गांसाठी 31 जागा आरक्षित असून अनुसूचित जाती 22, अनुसूचित जमाती 2 झाला आरक्षित आहेत.

Municipal Election: महापालिकांची निवडणूक  

1. बृहन्मुंबई - 2272. भिवंडी-निजामपूर - 903. नागपूर – 1514. पुणे – 1625. ठाणे - 1316. अहमदनगर - 687. नाशिक – 1228. पिंपरी-चिंचवड - 1289. छ. संभाजीनगर - 11310. वसई-विरार - 11511. कल्याण-डोंबिवली - 12212. नवी मुंबई - 11113. अकोला - 8014. अमरावती - 8715. लातूर - 7016. नांदेड-वाघाळा - 8117. मीरा-भाईंदर - 9618. उल्हासनगर - 7819. चंद्रपूर - 6620. धुळे - 7421. जळगाव - 7522. मालेगाव - 8423. कोल्हापूर - 9224. सांगली-मिरज-कुपवाड - 7825. सोलापूर - 11326. इचलकरंजी – 76 27. जालना28. पनवेल - 7829. परभणी – 65