Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा निकाल शुक्रवारी (16जानेवारी 2026) लागला. एकूण 29 प्रभागांमध्ये झालेल्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष मैदानात होते. एकूण 115 जागांपैकी सर्वाधिक 58 जागा काढणारा पक्ष भाजप ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये 97 जागांवर भाजप निवडणूक लढवत होता. शिंदे सेना 92 जागी मैदानात होती तर ठाकरेंच्या शिवसेनेने 97 जागांवर निवडणूक लढवली. काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी प्रत्येकी 77 जागांवर निवडणूक लढवत होती. तर एमआयएमने 48 जागांवर उमेदवार उभे केले होते. 115 जागांसाठी तब्बल 859 उमेदवार रिंगणात होते. संभाजीनगरच्या 11 लाख 17 हजार 477 मतदारांनी आपला कौल देत भाजपला 58 जागांवर निवडून आणलं आहे.

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगर च्या महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी अनेक बैठका पार पडल्या. पण जागा वाटपावर शेवटपर्यंत एकमत होऊ शकलं नाही .त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता.  संभाजीनगर महापालिका निवडणुकीत नेत्यांची मुलं, भाऊ, पीए, जातीचा उमेदवारांना तिकीट दिल्याने शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा आणि मुलगी, चंद्रकांत खैरे यांचा पुतण्या, अंबादास दानवे यांचा सख्खा भाऊ, अतुल सावे यांचे पीए तसेच खासदार भागवत कराड यांच्या निकटवर्तीय मैदानात असल्याने संभाजीनगरची निवडणूक चुरशीची ठरली .

Chhatrapati Sambhajinagar Election Result 2026:छत्रपती संभाजीनगर महापालिका निकाल

एकूण जागा - 115, एकूण प्रभाग-29

Continues below advertisement

भाजप - 58एमआयएम- 33शिंदे सेना- 12उद्धव सेना - 6वंचित बहुजन आघाडी - 4काँग्रेस-1राष्ट्रवादी शरद पवार गट - 1राष्ट्रवादी अजित पवार गट - 0

तुमच्या प्रभागातील नगरसेवक कोण ?

प्रभाग 1

अ - अशोक रंगनाथ हिवरे - एमआयएम

ब - विजयश्री यादव - एमआयएम

क - झिनत युनस पटेल - एमआयएम

ड - पठाण अजहर अय्युब - एमआयएम

प्रभाग 2

अ - पुष्पा उत्तमराव राजोतकर - भाजप

ब - किशोर बाबुराव नागरे - शिवसेना

क - सुवर्णलता पाटील - भाजप

ड - राजगौरव वानखेडे - भाजप

प्रभाग 3

अ - अमित भुईजळ - वंचित बहुजन आघाडी

ब - जरिना जावेद कुरेशी - वंचित

क - करुना मेघानंद जाधव - वंचित

ड - अफ्सर खान, यासिन खान - वंचित

प्रभाग 4

अ - प्रेमलता मिलिंद दाभाडे - शिवसेना

ब - राशीद मामू खान - शिवसेना (ठाकरे)

क - सावित्राबाई वाणी - शिवसेना (ठाकरे)

ड - गणेश लोखंडे - शिवसेना (ठाकरे)

प्रभाग 5

अ - रुही मोसिन खान - एमआयएम

ब - अब्दुल समीर, साजिद - एमआयएम

क - फरजाना साबेर हुसैन - एमआयएम

ड - अलि मीर वाजिद - एमआयएम

प्रभाग 6

अ - मोहम्मद वासिम अलीम - एमआयएम

ब - शेख नर्गिस सलीम - एमआयएम

क - शेख वाजिया बेगम - एमआयएम

ड - मेराज खान जलील खान - एमआयएम

प्रभाग 7

अ - जिवकल्प भिमराव हिवराळे - भाजपा

ब - सुनिला मधुकर सोनवणे - शिवसेना (ठाकरे)

क - ज्योती मुकेश जैन - भाजप

ड - महेश मालवतकर - भाजप

प्रभाग 8

अ - भारती महेंद्र सोनवणे - भाजप

ब - रामदास पंडित हरणे - भाजप

क - मोहिनी गायकवाड - भाजप

ड - विजय औताडे - भाजप

प्रभाग 9

अ - काकासाहेब काकडे - एमआयएम

ब - शाहीन रहीम पटेल -एमआयएम

क - सदीया अमजद खान -एमआयएम

ड - मतिन माजीद शेख - एमआयएम

प्रभाग 10

अ - सुरेखा सानप - भाजप

ब - अर्चना संजय चौधरी - भाजप

क - गणेश नवनदार - भाजप

ड - शिवाजी दांडगे - भाजप

प्रभाग 11

अ -  स्वामी विश्वनाथ    - भाजपब -  माधुरी देशमुख    - भाजपक-  मीन खरात     - भाजपड-  मयूर वंजारी    - भाजप

प्रभाग 12

अ  - शेख फरहतजहाँ  - एमआयएमब  - खान सुमय्या निसार   - एमयआयएमक  - मोहम्मद वाजेद   - एमआयएमड  - खान शेर हाजी अब्दुल  - एमआयएम

प्रभाग 13

अ  - सैय्यद सोहेल    - एमआयएमब  - मोहम्मद अलकेसरी   - एमआयएमक  - जोहरा समीन बिन   - एमआयएमड  - सय्यद उसामा अब्दुल  - एमआयएम

प्रभाग 14

अ  - कुरैशी मलेका बेगम   - एमआयएमब  - खान फिरोज    - एमआयएमक  - खान अलमास खानम  - एमआयएमड  - मुन्शी शेख    - एमआयएम

प्रभाग 15

अ  - खैरे सचिन सूर्यकांत   - शिवसेना (ठाकरे)ब  - अहम्मद तरन्नुम   - एमआयएमक  - इकबाल नुरजहाँ   - एमआयएमड  - जैस्वाल ऋषिकेश   - शिवसेना (शिंदे)

प्रभाग 16

अ  - संगिता नितीन सांगळे  - भाजपब   - राजू वाडेकर    - भाजपक  - आशा भालेवार    - भाजपड  - रामेश्वर भादवे    - भाजप

प्रभाग 17 

अ  - सीमा साळवे    - भाजपब  - मकरिये अनिल   - भाजपक  - किर्ती शिंदे    - भाजपड  - समीर राजूरकर   - भाजप

प्रभाग 18

अ  - हर्षदा शिरसाट    - शिवसेना ( शिंदे)ब  - जीवनलाल अभिजीत  - शिवसेना (शिंदे)क  - छाया वाघचौरे    - शिवसेना (शिंदे)क - राजू राजपूत मगनसिंग - शिवसेना (शिंदे)

प्रभाग 19

अ  - चंद्रकांत हिरावळे   - भाजपब  - शिल्पाराणी वाडकर   - भाजपक  - शोभा बुरांडे    - भाजपड  - सातिंदरसिंग ओबेराय  - राष्ट्रवादी (शरद पवार)

प्रभाग 20

अ  - जालिंदर शेंडगे    - भाजपब  - अर्चना निळकंठ   - भाजपक  - अनिता मानकापे   - भाजपड  - त्र्यंबक गणपतराव तुपे  - शिवसेना (शंदे)

प्रभाग 21

अ  - गवळी नंदलाल सुरेश  - भाजपब  - थोरात कमल दिलीप   - भाजपक - मात्रे सुमित्रा शंकरराव - भाजपड  - कुलकर्णी सुरेंद्र माणिकराव - भाजप

प्रभाग 22

अ  - निरपगारे पुष्पा कांतीलाल  - भाजपब - दामले अशोक धोंडीबा - भाजपक - शेळके यशोदा रामेश्वर - शिंदेसेनाड - जंजाळ राजेंद्र हिम्मतराव - शिंदेसेना

प्रभाग 23

अ - गायकवाड सुरेखा ताराचंद - भाजपब  - मुंडे बालासाहेब दिनकर - भाजपक - शिंदे सत्यभामा दामोदर - भाजपड  - राठोड प्रमोद प्रल्हाद  - भाजप

प्रभाग 24

अ  - भवरे गंगाबाई भीमराव - भाजपब  - नरोटे कमल रामचंद्र  - भाजपक  - ठुबे मुक्ता किसन  - भाजपड  - जगताप सुनील देवीदास - भाजप

प्रभाग 25 

अ - गांगवे मनोज बन्सीलाल - भाजपब - कोरडे वैशाली रामेश्वर - उद्धवसेनाक - खोतकर प्रियंका दीपक - भाजपड  - कावडे रवी साहेबराव  - भाजप

प्रभाग 26

अ  - साळवे अनिता मोहनलाल - भाजपब  - राजपूत पदमसिंग काशीनाथ- भाजपक  - कुलकर्णी सविता रत्नाकर - भाजपड - हिवाळे अप्पासाहेब  - भाजप

प्रभाग 27

अ  - गायकवाड दया कैलास - भाजपब  - केंद्रे गोविंद परशुराम  - भाजपक  - सोळुंके सुनीता संजय -  - भाजपड - वैद्य रेणुकादास दत्तोपंत - भाजप

प्रभाग 28

अ  - वाहूळ सुनीता मनोज  - एमआयएमब  - खान अब्दुल मतीन  - एमआयएमक  - अफसर नसीम बेगम  - एमआयएमड  - शेख साबेर पाशू  - एमआयएम

प्रभाग 29

अ  - शिरसाट सिद्धांत संजय  - शिंदेसेनाब  - घोडेले अनिता नंदकुमार - शिंदेसेनाक  - त्रिवेदी श्वेता सुमित  - शिंदेसेना