Chhatrapati Sambhajinagar BJP on Ambadas Danve: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं पूर्ण आयुष्य महिलांच्या सुरक्षेसाठी, हिंदूंच्या रक्षणासाठी आणिमहाराष्ट्राच्या रक्षणासाठी घालवले. परंतु मला खेद वाटतो, त्यांचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रकरणाची कुठलीही शहानिशा न करता तो व्हिडिओ व्हायरल केलाय. आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केलीय. तसेच आम्ही जर एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल आणि तिची सुरक्षा करण्यासाठी मी तिथे जात असेल तरत्यातगैरकाय? समोरचा व्यक्ती हा मनोरुग्न आहे. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अनेक वेळा 100 हून अधिक तक्रारी त्यावर दाखल आहेत. पोलिसांनी देखील त्याला तीन वेळा कारवाई करून पुणे येथील येरवडा रुग्णालयात दाखल केलेआहे.
मात्र, या सर्व प्रकरणाची शहानिशा न करता, एखाद्या नेत्याने चुकीचे आरोप करावे, आणि आमच्या बहिणींची आम्ही सुरक्षा करताना त्या अंबादास दानवेंना काही खटकत असेल, तर त्याचा मी निषेध करतो. अशीप्रतिक्रियाभाजपचे माजी नगरसेवक दामू अण्णा शिंदे यांनीदिलीआहे. माझ्यावर जर असेच चुकीचे आरोप हे करत राहिले तर मी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करेल, असेहीतेम्हणाले.
Ambadas Danve: अंबादास दानवेंकडून माजी नगरसेवकाच्या मारहाणीचा व्हिडीओ शेअर, अतुल सावेंवर गंभीर आरोप
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी एका मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या व्हिडीओमधील मारहाण करणारा व्यक्ती हा मंत्री अतुल सावे (Atul Save) यांचा जवळचा असल्याचा दावा दानवे यांनी केला. सोबतच संबंधित व्यक्ती माजी नगरसेवक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना दानवे म्हणाले, “ज्यांच्या हातात कायदा आहे, त्यांनी गुन्हेगाराची ‘भक्ती’ करण्यापेक्षा पीडिताला न्याय देण्याची हिंमत दाखवावी. सत्तेची ऊब असली की गुन्हेगारांचे हात कोणीही बांधू शकत नाही, हेच आजच्या सत्ताधारी मंडळींचे वास्तव आहे. बरोबर ना देवाभाऊ?” असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
Damu Anna Shinde: .....तर आम्ही जेलमध्ये देखील जायला तयार
दरम्यान, याचमुद्दयांवरआता स्व:ता भाजपचे माजी नगरसेवक दामू अण्णा शिंदे यांनीप्रतिक्रियादेतहेसर्वआरोपफेटाळूनलावलेआहे. छत्रपती संभाजीनगरच्या कुठल्याही भागात जर एखाद्या महिलेवर कोणी अत्याचार करायचा प्रयत्न केला तेव्हा खंबीरपणे आम्ही महिलांच्या बाजूने उभे राहू. त्यांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही जेलमध्ये देखील जायला तयार आहोत. असेहीदामूआण्णाशिंदेम्हणाले.
आणखी वाचा
