Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation election results : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणचे कल हाती येत आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकांचे कल देखील हाती आले आहेत. एकूण 115 जागांपैकी आतापर्यंत 33 जागांचे कल जाहीर झाले आहेत. भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. भाजपने 12 जागांवर आघाडी मिळवली असून, सत्तास्थापनेच्या दृष्टीने पक्षाची स्थिती भक्कम होताना दिसत आहे.
शिवसेनेने आतापर्यंत 6 जागांवर आघाडी घेतली आहे तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला 5 जागांवर आघाडी मिळाली आहे. एमआयएमनेही 5 जागांवर आघाडी मिळवली आहे. शहरातील आपली ताकद कायम ठेवली आहे. काँग्रेसने 3 जागांवर समाधानकारक कामगिरी केली असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही पक्षांना प्रत्येकी 1 जागांवर आघाडी मिळाली आहे.
आत्तापर्यंत कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप : 12
शिवसेना : 6
शिवसेना UBT : 5
एमआयएम : 5
काँग्रेस : 3
राष्ट्रवादी : 1
राष्ट्रवादी SP : 1
इतर