Chhagan Bhujbal Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकातील छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या एका मुलाखतीवरुन राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपण केवळ ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी भाजपसोबत (BJP) गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी लोकसत्ता अशी कोणतीच मुलाखत दिलेली नाही. तसेच ईडीपासून सुटका करण्यापासून आम्ही सर्व भाजपसोबत गेले, असा आरोप गेल्या अनेक दिवासांपासून आमच्यावर होतोच आहे. मला महाराष्ट्र सदन प्रकरणातून देखील न्यायालयाने क्लिनचीट दिली आहे, अशी आठवण छगन भुजबळ यांनी करुन दिली. तसेच वकिलांसोबत बोलून या प्रकरणाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं छगन भुजबळांनी सांगितले.
आम्ही विकासासाठी भाजपसोबत गेलो. आम्ही आमच्या मतदारसंघाचा विकास करु शकलो. माझ्या मतदारसंघात 2 हजार कोटींची कामे सुरु आहे. त्यामुळे भाजपसोबत गेल्याने आम्हाला विकास करण्यासाठी फायदा झाला. हे आताच का छापलं गेलं, हे मला कळलेलं नाही. मी अजून पुस्तक वाचलेलं नाहीय, यामध्ये काय लिहिलंय-काय नाही, हे बघेन आणि माझ्या वकिलांसोबत बोलेन, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. पुस्तकात नको-नको त्या गोष्टी लिहिल्या आहेत. यामगे नेमका काय हेतू आहे, याबाबत मला कल्पना नाही. सध्या मी खूप व्यस्त आहे. त्यामुळे मी निवडणुकीनंतर माझ्या वकिलांशी बोलून यावर निर्णय घेईन, असं छगन भुजबळ म्हणाले.
पुस्तक लिहिणारे राजदीप सरदेसाई काय म्हणाले?
जे पुस्तक आहे, लोकांनी ते पुस्तक वाचावं. पुस्तकात पूर्ण महाराष्ट्रात काय घटनाक्रम घडले, त्याचं स्पष्टीकरण या आहे. छगन भुजबळ यांनी ही स्पष्टीकरण दिलेल आहे. जनतेने पुस्तक वाचायला पाहिजे. पुस्तक वाचल्यानंतर त्यांना विचारा... राजकारणात मला काही रस नाही. पत्रकार लेखक म्हणून जी वस्तूस्थिती आहे, ती लिहली, असं राजदीप सरदेसाई यांनी सांगितले. छगन भुजबळ माझ्यासोबत बोलत असताना अनेक लोक त्यावेळी सोबत होते. यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही. हे राजकारणाचे प्रश्न आहे. राजकारण ज्यांना करायचा त्यांना करू द्या मी त्यात पडणार नाही. या पुस्तकात एक चॅप्टर महाराष्ट्रावर आहे. हे पुस्तक महाराष्ट्रावर नाही. मला भुजबळांबद्दल खूप आदर आहे. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यावर काही म्हणायचं नाही हे पुस्तक वाचा. त्यात कुठल्याही पक्षाचा काही नाही.. ज्या ज्या लोकांचं मत होतं.. हे मत इथे मांडलेला आहे. छगन भुजबळ यासह अनेक विषयावर बोलले. पुस्तकाचा एक पॅरेग्राफ घेऊ नका. एका पॅरेग्राफवर राजकारण होतं. पूर्ण पुस्तक वाचा. पुस्तकांचा टाइमिंग काहीच नाही. 2014, 2019 आणि 2024 मी नोव्हेंबर महिन्यात पुस्तक लिहिलेले आहे. याचा आणि निवडणुकीचा टाइमिंगच्या काहीही संबंध नाही, असंही राजदीप सरदेसाई यांनी स्पष्ट केलं आहे.