Chhagan Bhujbal : समीर भुजबळ (Sameer Bhujbal) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन निवडणुकीत उभे राहिले असल्याचे मत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केलं. कारण ते राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष होते. त्याप्रमाणे त्यांनी सर्व पदांचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी महायुतीत असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांचे उमेदवार ऐकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. ते फक्त नाशिमध्येच झालं नसल्याचे भुजबळ म्हणाले.
समीर भुजबळ हे राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन स्वतंत्र अपक्ष उभे
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे देखील अनेक ठिकाणी ऐकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे राहिले आहेत. 4 तारखेच्या नंतर सगळं चित्र स्पष्ट होईल असेही ते म्हणाले. समीर भुजबळ हे स्वतंत्र अपक्ष उभे आहेत. आम्हाला सुद्धा त्यांना घड्याळाची निषाणी देता आली असती पण काही इथिक्स पाळल्याचे भुजबळ म्हणाले. त्यामुळं समीर भुजबळ यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. नाहीतर तुम्हाला पक्षातून काढून टाकावं लागेल असेही भुजबळ म्हणाले.
पाच वर्ष काम केले की लोक निवडून देतात
अजित पवार यांनी आर आर पाटील यांच्यासंदर्बात केलेल्या वक्तव्यावर देखील छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. मला यावर जास्त काही बोलायचं नाही. आज आबा हयात नाहीत. हे सर्व प्रकरण अजित पवार यांनी यापूर्वी शरद पवारांच्या कानांवर घातले होते असेही छगन भुजबळ म्हणाले. तसेच नवाब मलिक यांच्याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, कोणी कोणाचा प्रचार न करता निवडून येता येतं. पाच वर्ष काम केले की लोक निवडून देतात असेही भुजबळ म्हणाले.
4 नोव्हेंबरपर्यंत बंडखोरीच्या बाबतीत सगळं चित्र स्पष्ट होईल असेही भुजबळ म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल वाजले आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघात (Nandgaon Assembly Constituency) गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नांदगावमधून विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. समीर भुजबळ हे नांदगावमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या: