Chandrashekhar Bawankule BJP and MIM alliance: अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदमध्ये सभापती पदासाठी भाजप (BJP) आणि एमआयएम खासदार ओवैसींच्या (Asaduddin Owaisi) एमआयएमची (AIMIM) युतीझाल्याचीराजकीयवर्तुळातजोरदारचर्चाआहे. समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमने एकमेकांना साथ दिल्याचं (BJP and MIM alliance) बोललं जातंय. शिवाय एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद मिळाल्याचीही चर्चा आहे. अशातच आता या युती संदर्भात भाजप नेतेआणिमहसूलमंत्रीचंद्रशेखरबावनकुळेयांनीप्रतिक्रियादेतभाष्यकेलंआहे. (Achalpur Nagar Parishad Result 2026)
अमरावतीच्या अचलपूरमध्येआपले-आपले गट स्थापन केले आहे. भाजपच्या गटात एमआयएम (AIMIM) आणि काँग्रेस नाही. त्यांनी गट करून सभापती वाटून घेतले आहे. शिवाय भाजप एमआयएमला कधीही सोबत घेणार नाही. आमचा कुठलाही पाठिंबा एमआयएमला नाही. अशाशब्दात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यायुतीसंदर्भातभाष्यकरतस्पष्टीकरण दिलय.
BJP and MIM alliance : अचलपूर नगर परिषदमध्ये एमआयएम पार्टीचा कोणताही गट इथे अस्तित्वात नाही
दुसरीकडे, या युती संदर्भात बोलताना अचलपूर भाजप नगराध्यक्षा रुपाली माथने यांनी स्पष्टीकरण देत या चर्चेवर भाष्य केलंय. एमआयएम हा हिंदू विरोधी पक्षाशी भारतीय जनता पार्टीची कोणतीही युती आम्ही केलेली नाही आणि अचलपूर नगर परिषदमध्ये एमआयएम पार्टीचा कोणताही गट इथे अस्तित्वात नाही. अचलपूर नगर परिषदमध्ये काँग्रेस पक्षाचे 15 नगरसेवक असून त्यांनी दि. 21 जानेवारी रोजी झालेल्या विषय समितीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतलेला नाही. असे स्पष्टीकरण भाजपच्या नगराध्यक्षा रूपाली माथणे यांनी दिलंय.
दरम्यान, अचलपूर नगर परिषदमध्ये काँग्रेस पक्षाचे 15 नगरसेवक, 3 नगरसेवक एमआयएमचे, 2 नगरसेवक राष्ट्रवादीचे, 1 नगरसेवक अपक्ष असे एकूण 21 मुस्लिम नगरसेवक निवडून आलेले आहेत. तसेच, अचलपुर नगर परिषदमध्ये प्रहार पक्षाचे 2 नगरसेवक भाजपचे आणि अपक्ष मिळून 10 नगरसेवक आणि अपक्ष 8 नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. इथे काँग्रेस आघाडीचा एक गट, अचलपूर विकास आघाडीचा एक गट आणि अचलपूर परतवाडा विकास आघाडीचा एक गट तसेच भाजपचा एक गट असे बलाबल आहे. तसेच, भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष असून सध्या मीडिया वर सुरु असलेली बातमी ही खोटी आहे.असं स्पष्टीकरण नगराध्यक्ष रुपाली माथने यांनी दिले आहे.
अचलपूर नगर पालिका निकाल
नगराध्यक्ष पदी भाजपच्या रुपाली माथने विजयी
सदस्य संख्या
काँग्रेस - 15
भाजप - 9
एमआयएम - 3
प्रहार - 2
अपक्ष - 10
Chandrashekhar Bawankule : काही ठिकाणी भाजप आणिशिवसेनेसोबत युती,राष्ट्रवादीमध्ये चर्चा
जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात महायुतीने काही ठिकाणी भाजप आणिशिवसेनेसोबत युती झाली आहे. काही ठिकाण ती होऊ शकली नाही. मात्र त्या- त्या भागातील नेत्यांनी बसून सकारात्मक चर्चा झाली आहे. एका ठिकाणी सेना व राष्ट्रवादीमध्ये चर्चा झाली आहे. काही ठिकाणी कार्यकर्ते आग्रही झाले आहे. त्याठिकाणी स्वतंत्र लढले जात आहे
ही बातमी वाचा:
