Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूर महानगरपालिकेतील (Chandrapur Election 2026) सत्ता स्थापनेचा पेच राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या चंद्रपूरमध्ये काँग्रेसला (Congress) अंतर्गत दुफळीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात असून, दोन्ही गटांतील वादाचा थेट लाभ तिसऱ्याच पक्षाला होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या साऱ्या राजकीय गणितात शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप (BJP) आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना ठाकरे गटाच्या पाठिंब्याची गरज आहे. याच संधीचा फायदा घेत ठाकरेंच्या शिवसेनेने थेट महापौर पदासाठी डाव टाकल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे भाजपकडून ठाकरे गटाला सत्ता स्थापनेसाठी सव्वा-सव्वा वर्षे महापौर पदाची ऑफर दिल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे मोठे राजकीय आव्हान उभे ठाकले असून, सत्ता स्थापनेचा सस्पेन्स टोकाला पोहोचला आहे. शिवसेना ठाकरे गट नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलंय. 

Continues below advertisement

Sanjay Raut on Chandrapur Mayor Election 2026: नेमकं काय म्हणाले संजय राऊत? 

संजय राऊत म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की, एक वेळ विरोधी पक्षात बसावे लागले तरी चालेल पण भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल, अशा प्रकारची कुठलीही भूमिका घेता येणार नाही, त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज निवडणूक

दरम्यान, राज्यातील सर्वाधिक चर्चित आणि अंतर्गत राजकीय वर्चस्वामुळे गाजत असलेली चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक होत आहे. 66 सदस्यांच्या या महानगरपालिकेत 34 हा बहुमताचा आकडा कुणालाही मिळालेला नसल्याने भाजप, काँग्रेस, उबाठा शिवसेना यांच्यात मोठी रस्सीखेच आहे, सोबतच भाजपमध्ये असलेला जोरगेवार-मुनगंटीवार वाद आणि काँग्रेसमध्ये असलेला वडेट्टीवर-धानोरकर वाद देखील गेल्या एक महिन्यांपासून गाजत आहे.  महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. सकाळी 11 वाजता महासभेच्या कामकाजाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी विनय गौडा पिठासीन अधिकारी असणार आहेत. सर्वात आधी महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या अर्जांची छाननी व त्यानंतर अर्ज परत घेणे असा क्रम राहणार आहे. 

Continues below advertisement

Chandrapur Election Result 2026: चंद्रपूर महापालिका पक्षीय बलाबल

एकूण जागा : 66

काँग्रेस : 27

काँग्रेसशी निवडणूक पूर्व आघाडी असलेली जनविकास सेना : 3

भाजप : 23

शिंदेसेना : 1

उबाठा : 6

वंचित : 2

बसपा : 1

अपक्ष (काँग्रेस बंडखोर) : 2

एमआयएम : 1

आणखी वाचा 

Chandrapur: चंद्रपुरात भाजपकडून ठाकरे गटाला 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्षपदासह उपमहापौर पदाची ऑफर? सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले....