एक्स्प्लोर

BMC Shiv Sena Swikrut Nagarsevak : स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग, एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पराभूत नगरसेवकांच्या घिरट्या; 'या' दोन नावांची जोरदार चर्चा

BMC Shiv Sena Swikrut Nagarsevak : मुंबई महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पद मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार लॉबिंग केली जात आहे.

BMC Shiv Sena Swikrut Nagarsevak : बृहन्मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) स्वीकृत नगरसेवकांच्या (Swikrut Nagarsevak) जागांवरून राजकीय हालचालींना वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shiv Sena) या पदांसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पालिकेत शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या दोन जागांसाठी अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

BMC Shiv Sena Swikrut Nagarsevak : नंदनवन बंगल्यावर इच्छुकांच्या फेऱ्या

या पार्श्वभूमीवर काही माजी नगरसेवक तसेच पराभूत उमेदवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यावर फेऱ्या मारताना दिसत आहेत. स्वीकृत नगरसेवकपदासाठी वरिष्ठ नेत्यांकडे शिफारशी आणि संपर्क वाढवले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

BMC Shiv Sena Swikrut Nagarsevak : दोन नावांची जोरदार चर्चा

सध्या या पदासाठी बोरिवलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र राज सुर्वे यांच्या नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. पालिकेच्या निवडणुकीवेळी पक्षाने बाळकृष्ण ब्रीद यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र काही कागदोपत्री त्रुटींमुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही. त्या वेळी त्यांनी पक्षाने दिलेला एबी फॉर्म अपक्ष उमेदवाराला दिला होता. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून त्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

BMC Shiv Sena Swikrut Nagarsevak : सुर्वेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न?

दुसरीकडे आमदार प्रकाश सुर्वे यांनी आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र त्यावेळी तिकीट न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे राज सुर्वे यांना स्वीकृत नगरसेवकपद देऊन पक्षाकडून ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे बोलले जात आहे. 

BMC Shiv Sena Swikrut Nagarsevak : अंतिम निर्णयाकडे लक्ष

स्वीकृत नगरसेवकांच्या दोन जागांसाठी सुरू असलेल्या या लॉबिंगमुळे शिवसेनेत अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. अखेर पक्ष नेतृत्व कोणाला संधी देणार, याकडे आता मुंबईच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

BMC Election Result 2026: मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे 89 आणि शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत तर मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसचे 24 नगरसेवक, एमआयएमचे 8 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 3, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आणि समाजवादी पक्षाचे 2 नगरसेवक यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झाले आहेत. 

आणखी वाचा 

Maharashtra Police: 'खाकी स्वॅग'चा ट्रेंड आटोक्यात येणार, पोलिसांना गणवेशात सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्यास बंदी; नेमकं कारण काय?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
मोठी बातमी : शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
Rajya Sabha Election 2026: राजकारण कोळून प्यायलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी का दिली? संजय शिरसाटांनी सांगितलं पडद्यामागचं राज'कारण'
राजकारण कोळून प्यायलेल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी का दिली? संजय शिरसाटांनी सांगितलं पडद्यामागचं राज'कारण'
Rajya Sabha Election 2026: ज्येष्ठ नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते पण ऐनवेळी एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याने शिवसेनेत नाराजी
ज्येष्ठ नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते पण ऐनवेळी एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याने शिवसेनेत नाराजी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 
सोने चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Nitish Kumar: नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate: राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
Embed widget