पुणे: राज्यभरातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल समोर येऊ लागले आहेत. राज्यभरातील महानगरपालिकांमध्ये यावेळी भाजपच मोठा पक्ष असल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी भाजपने एकहाती सत्ता मिळवल्याचं चित्र आहे. तर इतिहासात पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिका भाजपच्या हाती जाताना दिसत आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबईतील 227 जागांपैकी 127 जागांवार भाजप आणि शिवसेनेची आघाडी दिसून येत आहे. भाजपाची जवळपास 96 जागांवर आघाडी पाहायला मिळत आहे. अशातच महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधुची युती झाली होती, त्यांनी मुंबईतील मराठी मतदारांना भावनिक साद घातली होती, मात्र निकालामध्ये त्याचं कोणतंही प्रतिबिंब दिसून आलं नाही. त्यानंतर आता समोर येत असलेल्या निकालावरती भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवत धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे.

Continues below advertisement

भाजपचा होत असलेला विजय आणि शिवसेना ठाकरे गटाच्या निकालानंतर नितेश राणे यांनी थेट उद्धव ठाकरेंची आणि आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवत धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते पेग्विंन म्हणत, जय श्रीराम म्हणत कुत्सीतपणे हसत असल्याचे दिसत आहेत.

मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल (BMC Election Result 2026) जाहीर होत आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी 227 जागांसाठी जवळपास 52.94 टक्के मतदान झालं. मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 जागांची गरज आहे. हा आकडा कोण गाठणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरेंची मनसेने युती केली. ठाकरे बंधूंच्या या युतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला. त्यामुळे मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले. तर दुसरीकडे ठाकरेंचा गड काबीज करण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र्य मैदानात उतरली. तर काँग्रेस आणि वंचितने एकत्र निवडणूक लढवली. 

मुंबई महापालिका निवडणूक - पक्ष निहाय माहिती 

भाजपा ४२ शिवसेना ठाकरे ३४शिंदे १६काँग्रेस १३एमआयएम ६समाजवादी पार्टी  ३मनसे २ncp १