BMC Election मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांना शिवसैनिकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रभाग क्रमांक 3 भाजपला सोडल्यानं नाराज शिवसैनिकांनी प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात निदर्शनं केली आहेत. प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रकाश सुर्वे यांनी प्रकाश पुजारी यांना तयारी करण्यासाठी सूचना दिल्या गेल्या होत्या. ऐनवेळी हा वॉर्ड भाजप नेते प्रविण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर यांना सोडण्यात आला, यामुळं नाराज शिवसैनिकांनी प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात निदर्शनं केली.
Prakash Surve प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिकांची निदर्शनं
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अवघा एक तास उरला असतानाच मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात असंतोष उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. इच्छुक उमेदवार वैष्णवी पुजारी यांना डावलून बाहेरील उमेदवार भाजपाकडून लादण्यात आला आहे. याचा निषेध करण्यासाठी शिंदे गटाचे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवत आमदार प्रकाश सुर्वे आणि उमेदवार प्रकाश दरेकर यांचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर समर्थकांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली.
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी इतर मतदारसंघात तडजोड करावी लागल्यामुळे हा मतदारसंघ भाजपाला गेल्याचा दावा प्रकाश पुजारी यांच्याकडून करण्यात आला सोबतच या ठिकाणी कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून वरिष्ठ नेत्यांनी बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर केल्याचे वैष्णवी पुजारी यांनी म्हटले आहे.
प्रकाश पुजारी यांना तयारीचे आदेश ऐनवेळी जागा भाजपकडे
दहिसर मध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे विरोधात शिवसैनिकांकडून जोरदार निदर्शन केली जात आहेत. सुर्वे यांना काळे झेंडे दाखवून विरोध केला जात आहे. दहिसर मध्ये वॉर्ड क्रमांक तीन मधून प्रकाश पुजारी यांच्या मुलगी इच्छुक उमेदवार होती. आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून प्रकाश पुजारी यांना निवडणुकीच्या तयारी करण्यासाठी सूचना देण्यात आला होता. मात्र, वार्ड क्रमांक तीन मध्ये पुजारी यांना उमेदवारी देण्याऐवजी ती जागा भाजपकडे गेली. भाजपकडून विधान परिषदेचे आमदार प्रविण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज इच्छुक उमेदवार प्रकाश पुजारी आणि त्यांच्या समर्थकांकडून आमदार प्रकाश सुर्वे विरोधत जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 90 जागा मिळाल्या आहेत. तर, भाजप 137 जागांवर मुंबई महापालिका निवडणूक लढणार आहे.