एक्स्प्लोर

BMC Election 2026: ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात प्रचंड गोंधळ, मतदार यादीतून अनेकांची नावं गायब, नेमकं काय घडलं?

BMC Election 2026: काही मतदारांचे नाव वार्ड क्रमांक १९२ मधून १९१ मध्ये गेले आहे पण १९१ मध्ये ही नाव नसल्याची बाब समोर आली आहे, त्यामुळे मतदान करण्यासाठी पहिल्याच तासात मतदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

BMC Election 2026:  राज्यात २९ महानगरपालिका निवडणुकीसाठीचं (BMC Election 2026) मतदान पार पडत आहे. एकीकडे मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे तर दुसरीकडे मतदानाच्या पहिल्याच तासात काही ठिकाणी घोळ दिसून आला आहे. दादरमध्ये मतदार यादीत घोळ असल्याचं मतदारांनी (BMC Election 2026) म्हटलं आहे. दादरच्या बालमोहन विद्यामंदिर येथे आलेल्या मतदारांचे नाव यादितींच गायब असल्याची खंत मतदारांनी व्यक्त केली आहे. तासाभरापासून मतदान करण्यासाठी मतदार धावपळ करत आहे पण थेट यादीत नावच नाही त्यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला आहे. तर काही मतदारांचे नाव वार्ड क्रमांक १९२ मधून १९१ मध्ये गेले आहे पण १९१ मध्ये ही नाव नसल्याची बाब समोर आली आहे, त्यामुळे मतदान करण्यासाठी पहिल्याच तासात मतदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.(BMC Election 2026)

त्याचबरोबर १९२ च्या यादीतून संपूर्ण ५ जणांचे कुटुंबाचे नाव वगळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे या मतदारांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, संपूर्ण कुटुंबाचे नाव नाही आहे असे एक महिला म्हणाली आहे. तर एका मतदाराचं नाव यादीत नसल्याने ते नाव शोधण्यासाठी तासभरापासून कोहिनूर आणि बाल मोहनला फिरत आहेत.

तर सुधीर क्षीरसागर नावाच्या एका मतदाराने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, आम्ही दादरमध्येच राहतो, आमचा वॉर्ड आहे १९२, आता आम्हाला दिलेल्या स्लीपमध्ये १९१ लिहून दिलं आहे, मी आता सकाळी इथे येऊन पाहिलं, नाव सापडत नाहीये. आमचं सुरूवातीपासून दिलेल्या वॉर्डमधून आमचं नाव गायब आहे, जेव्हापासून मतदान करतो आहे, तेव्हापासून इथेच आहे.जवळपास ३० ते ४० वर्षे तिथेच बाल मोहनला केलं आहे, आता ते सांगत आहे, नाव दुसऱ्या ठिकाणी आलं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं शोधायचं?

मतदार याद्या या दरवेळी अपडेट होत असतात, दरवेळी यादीत काही बदल होत असतात. काही वेळा मतदार यादीतील तुमचं नाव चुकू शकतं किंवा तुमच्या पत्त्यात काही बदल झालेला असू शकतो किंवा तुमचं दरवेळी त्याच ठिकाणी येणारं नतदा

काही वेळा चुकीने तुमचं नाव वगळलं जाऊ शकतं, त्यामुळे या सर्वाची खबरदारी म्हणून तुम्ही मतदार यादीत तुमचं नाव चेक केलं पाहिजे, अन्यथा ऐन वेळी तुम्हाला मतदान करता येणार नाही. मतदार यादीतील तुमच्या तपशीलात काही दुरुस्ती असल्यास तुम्ही त्या निवडणुकाच्या 10 दिवस आधीपर्यंत बदलून घेऊ शकता.

मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधाल?

1. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत तुमचं नाव शोधू शकता. त्यासाठी सर्वप्रथम भारतीय निवडणूक आयोगाच्या या लिंकवर क्लिक करा - https://electoralsearch.eci.gov.in/

2. आता वेबसाईटच्या वरच्या बाजूला तुम्हाला 3 पर्याय दिसतील. 'Search by Details', 'Search by EPIC',
'Search by State' आणि Captcha Code  येतो हे पर्याय भरून घ्या आणि सर्चवरती क्लिक करा.

3. आवश्यक माहिती (Basic Information) आणि कॅप्चा कोड सबमिट करा, यानंतर 'Search' वर क्लिक करा.

4. यानंतर आता खाली मतदार यादीतील तुमचं नाव, EPIC Number आणि सर्व माहिती दिसेल.

5. जर सर्च केल्यानंतरही तुम्हाला तुमचं नाव दिसत नसेल तर तुम्ही भरलेले तपशील एकदा तपासून पाहावे किंवा तीनपैकी इतर दोन पर्यायाचा वापर करावा. तरीही नाव न दिसल्यास राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा.

SMS द्वारे मतदार यादीतील नाव तपासा

एसएमएसद्वारे मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी सर्वात प्रथम मेसेज टाईप करताना स्पेस दाबा. त्यानंतर तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक टाईप करा. हा एसएमएस 9211728082 किंवा 1950 वर पाठवा. याचं उत्तर तुम्हाला एसएमएसमध्ये मिळेल. तसेच एसएमएसमध्ये भाग क्रमांक, मतदान केंद्र क्रमांक आणि नाव पाठवलं जाईल. तुमचे नाव मतदार यादीत नसल्यास, ‘नो रेकॉर्ड फाऊंड’ असा मेसेज येईल.

तुमचे नाव यादीत शोधण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:

नाव शोधण्याची सोपी प्रक्रिया:

१. वेबसाईटला भेट द्या: सर्वात आधी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला voters.eci.gov.in भेट द्या.

२. पर्याय निवडा: होमपेजवर दिसणाऱ्या 'Search Your Name in Voter List' या पर्यायावर क्लिक करा.

३. माहिती भरण्याचे प्रकार: तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. तिथे नाव शोधण्यासाठी तीन पर्याय मिळतील:

EPIC (ओळखपत्र) नंबरद्वारे

वैयक्तिक माहितीद्वारे (Search by Details)

मोबाईल नंबरद्वारे

४. तपशील भरा: आपण 'Search by Details' हा पर्याय निवडल्यास, तिथे तुमचे राज्य, भाषा, स्वतःचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, जन्म तारीख, वय, लिंग, जिल्हा आणि तुमचा विधानसभा मतदारसंघ ही माहिती अचूक भरा.

५. कॅप्चा कोड: सर्व माहिती भरल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड (Captcha) टाईप करा आणि 'Search' वर क्लिक करा.

६. माहिती तपासा: जर तुमचे नाव यादीत असेल, तर खाली तुमची माहिती दिसेल. त्यानंतर 'View Details' वर क्लिक करा.

७. मतदान केंद्राची माहिती: येथे तुम्हाला तुमचे नाव, मतदान केंद्र (Polling Station), भाग क्रमांक आणि अनुक्रमांक अशी सर्व महत्त्वाची माहिती पाहायला मिळेल.

८. स्लिप डाऊनलोड करा: सर्वात शेवटी 'Print Voter Information' या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमच्या मतदान माहितीची पीडीएफ (PDF) डाऊनलोड करू शकता. ही प्रिंट तुम्हाला मतदानाच्या दिवशी ओळख म्हणून सोबत ठेवता येईल.

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
Belgium PM Bart De Wever in India: बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
Rooftop Solar: भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
Belgium PM Bart De Wever in India: बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
बेल्जियमच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एक खास भेट आणली, पण दिली नाही? बार्ट डी वेव्हर यांनी सांगितलं कारण, म्हणाले...
Rooftop Solar: भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Divija Fadanvis Video: देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Beed Well News: निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडी ठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडीठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
Embed widget