मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष एकत्र लढतोय. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून काल आणि आज एबी फॉर्म वाटप करण्यात आलं. उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईत 163 जागा लढत आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यानं आणखी एका पदाधिकाऱ्यानं  बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाकरेंची शिवसेना बंडखोरी करणाऱ्यांचं समाधान कसं करणार याकडे लक्ष लागलं आहे. 

Continues below advertisement

वॉर्ड क्रमांक 197 मनसेकडे जाताच बंडखोरी

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात आणखी एक बंडखोरी झाली आहे.  वरळीत मनसेला गेलेल्या जागेवर ठाकरे गटाच्या पदाधिकारी असलेल्या श्रावणी देसाई यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.  वॉर्ड क्रमांक 197 मधून श्रावणी देसाई यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. 197 वॉर्ड मनसेला गेल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. मनसेनं वॉर्ड क्रमांक  197 मध्ये रचना साळवी यांना उमेदवारी दिली आहे.    

प्रभाग क्रमांक 197 प्रमाणं प्रभाग 196 मध्ये देखील ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य पाहायला मिळालं. प्रभाग क्रमांक 196 आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात नाराजीनाट्य पाहायला मिळालं होतं.  वॉर्ड क्रमांक 196 मध्ये आशिष चेंबूरकर यांच्या पत्नी पद्मजा चेंबूरकर यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज झालेल्या शाखाप्रमुख संगीता जगताप यांनी पदाचा राजीनामा दिला होता. वरळीतील बंडखोरी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी इच्छुक आणि ज्यांना उमेदवारी दिलीय त्यांच्याशी चर्चा देखील केलेली.

Continues below advertisement

ठाकरेंच्या शिवसेनेत कोणत्या ठिकाणी बंडखोरी

95 चंद्रशेखर वायंगणकर, ठाकरे (अधिकृत उमेदवार हरी शास्त्री - ठाकरे)

106 सागर देवरे, ठाकरे (अधिकृत उमेदवार सत्यवान दळवी - मनसे)

114 अनिशा माजगावकर, मनसे (अधिकृत उमेदवार राजोल पाटील - ठाकरे)

169 कमलाकर नाईक, ठाकरे (अधिकृत उमेदवार प्रवीणा मोरजकार - ठाकरे)

193 सूर्यकांत कोळी, ठाकरे (अधिकृत उमेदवार हेमांगी वरळीकर - ठाकरे)

196 संगीता जगताप, ठाकरे (अधिकृत उमेदवार पद्मजा चेंबूरकर - ठाकरे)

202 विजय इंदुलकर, ठाकरे (अधिकृत उमेदवार श्रद्धा जाधव - ठाकरे)

202 दिव्या बडवे, ठाकरे (अधिकृत उमेदवार भारती पेडणेकर - ठाकरे)

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 163 जागा लढवत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 53 जागा तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 11 जागा लढवत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा देखील झाली आहे.