BMC Election 2026 मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांची मतदारयादी (Mumbai Mahapalika Election ) अंतिम टप्प्यात आहे. अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. मुंबईत शिवसेना आणि मनसेची युती (Shiv Sene - MNS ) झाल्यानंतर जागावाटपही जवळपास फायनल झालं आहे. मात्र अजून ठाकरे किंवा महायुतीकडून कोणतीही उमेदवारांची अधिकृत नावं जाहीर केलेली नाहीत. असं असताना ठाकरेंचे निष्ठावंत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे लहान भाऊ संदीप उर्फ अप्पा राऊतही (Sandeep Raut Brother) निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं चित्र आहे. संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या विक्रोळीतून संदीप राऊत मुंबई मनपाची निवडणूक (Vikroli Ward) लढवण्याच्या तयारीत आहेत. 

Continues below advertisement

विक्रोळीत चढाओढ (Vikroli Ward BMC Election)

संदीप राऊत विक्रोळीतील ज्या वॅार्डसाठी इच्छुक आहेत, तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटही आग्रही आहे. तिथूनच संदीप राऊत लढवण्यास इच्छुक आहेत. मुंबईत ठाकरे बंधूंची युती झाली आहे. मात्र काँग्रेसने स्वतंत्र लढण्याची घोषणा आधीच जाहीर केली आहे. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाकरेंसोबत चर्चा सुरु आहे. काल शुक्रवारीच जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी मुंबईची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवण्यासाठी पवारांची राष्ट्रवादी उत्सुक असल्याचं सांगितलं होतं.  

मात्र मनसेच्या एन्ट्रीने काँग्रेसने मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय  घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटासोबत राष्ट्रवादी युती करणार का हे अद्याप निश्चित नाही.  जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे यांची युती जाहीर झाली नाही तर विक्रोळीत संजय राऊतांचे बंधू संदीप राऊत ठाकरेंचे उमेदवार असू शकतात. 

Continues below advertisement

विक्रोळीतील 111 नंबरच्या वॅार्डवरून शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात वाद सुरु असून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनंजय पिसाळ तेथून लढण्यास इच्छुक आहेत. परंतु आता संदीप राऊत यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून वॅार्ड नंबर 111 मधून निवडणूक लढवण्यास तयारी  करत असल्याचं समोर आलं आहे. 

भावाच्या उमेदवारीवर संजय राऊत काय म्हणाले?  (Sanjay Raut on Sandeep Raut)

मुंबईमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर आमची सकारात्मक चर्चा झाली. त्यांना ज्या जागा हव्या होत्या त्यातल्या बहुतेक जागा त्यांना दिल्या आहेत. आमच्या युतीत काही अडचण या क्षणी दिसत नाही, मनसेच्या गोटातल्या काही जागा आहेत . पण आम्ही त्यांचं समाधान केलंय. शरद पवारांची राष्ट्रवादी आमच्यासोबत असावी आमची इच्छा आहे. आमच्या वाट्याच्या जागा दिल्या आहे. आमचं नुकसान झालं पण ठीक आहे ते चालेल.  आमच्या अनेक जागा मनसेला सीटिंग आहेत. आमचेही लोक नाराज झाले, पण युतीमध्ये या गोष्टी पहायच्या नाहीत.  

दुसरीकडे संदीप राऊतबद्दल मला माहिती नाही, मला वाटत नाही असं संजय राऊत यांनी एका वाक्यातच संदीप राऊतांच्या उमेदवारीबाबत विषय संपवण्याचा प्रयत्न केला. पण संदीप राऊत निवडणूक लढणार की नाही या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालं नाही. 

  Municipal Corporations Election Schedule : महापालिकेच्या निवडणुकीच्या तारखा

नामनिर्देशन पत्र स्वीकारणे - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबरअर्जाची छाननी  - 31 डिसेंबरउमेदवारी माघारीची मुदत - 2 जानेवारीचिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी - 3 जानेवारीमतदान - 15 जानेवारीनिकाल - 16 जानेवारी  

Sanjay Raut reaction brother Sandeep Raut : भावाच्या उमेदवारीवर संजय राऊत काय म्हणाले?

 

संबंधित बातम्या

अजित पवार-शरद पवारांची प्रस्तावित आघाडी तुटली, पुण्यात पवार गटाने दादांचा प्रस्ताव फेटाळला!