BMC Election 2026 Voting: राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज (दि. 15) मतदान प्रक्रिया पार पडत असून, सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत नागरिक मतदानाचा हक्क बजावत आहेत. मुंबईतील (Mumbai) अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागलेल्या असतानाच, दहिसर मतदारसंघात एक गोंधळाची घटना घडली आहे. पोलीस (Police) आणि ठाकरेंचे ‘भगवा गार्ड’ यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे.
ही घटना मुंबईच्या दहिसर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ८ मधील मतदान केंद्रावर घडली. भाजपच्या आमदार मनीषा चौधरी या मतदान केंद्रावर पाहणीसाठी पोहोचल्या असताना, तेथे उपस्थित असलेल्या ‘भगवा गार्ड’कडून विरोध करण्यात आला. या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
BMC Election 2026 Voting: ‘भगवा गार्ड’ला पोलिसांनी रोखले
घटनास्थळी ‘भगवा गार्ड’ आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संबंधित गार्डला रोखले. मनसे नेते नयन कदम यांच्याकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रत्येक मतदार सेंटरवर दोन भगवा गार्ड तैनात करण्यात आले आहे. मात्र, निवडणूक आयोगाची कुठलीही परवानगी या भगवा गार्डला नाही.
BMC Election 2026 Voting: कारवाईची शक्यता
भगवा गार्डकडून पोलिसांसोबत हुज्जत आणि गोंधळ घालतानाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या भगवा गार्ड विरोधात कारवाई करण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, या घटनेमुळे काही काळ मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता या भगवा कार्ड विरोधात नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Vasai-Virar Election Voting: वसई-विरारमधील मतदान केंद्रावर तीन तास EVM मशीन बंद
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक मतदान केंद्राची मशीन तब्बल तीन तास बंद राहिल्याची घटना समोर आली आहे. सकाळपासूनच काही ठिकाणी मशीन अर्धा ते एक तास बंद असल्याचे निदर्शनास आले, मात्र प्रभाग क्रमांक 26, उमेळमान येथील जिल्हा परिषद शाळा, खोली क्रमांक 3, मतदान केंद्र 28 येथे मशीन तब्बल तीन तास बंद होती. यामुळे येथील उमेदवार आणि मतदारांमध्ये चांगला तणाव निर्माण झाला.
शिवाय, काही ठिकाणी विशिष्ट पक्षाचा लोगो दाबला जात नसल्याचे तक्रारी देखील मिळाल्या. वास्तविक एक्स्ट्रा मशीन उपलब्ध असूनही, बिघाड झाल्यानंतर 10-15 मिनिटांत नवीन मशीन लावणे आवश्यक असते, मात्र निवडणूक आयोगाचा ढिसाळ कारभार यामुळे स्पष्ट झाला आहे. मतदान प्रक्रियेतील ह्या तांत्रिक गफलतीवर सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा
