BMC Election 2026: चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून लावण्यात आलाय. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्या सुन तन्वी काते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी हा आरोप लावण्यातआलाहोता.
दरम्यान, शिंदेच्या शिवसेनेचे उप विभाग संघटक रवींद्र महाडीक, लक्ष्मण पांढरे आणि आमदार तुकाराम काते यांचा मुलगा तुषार काते हे मतदान केंद्रावर रात्री साडे बारा वाजताच्यासुमारास आत शिरल्यानेएकच गोंधळ निर्माण झालाय. तरहाचमुद्दाउपस्थितकरत ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या कार्यकर्त्यांकडून आक्षेपघेत सवाल उपस्थित केलाय की, मध्यरात्री सामान्य माणूस मतदान केंद्रावर जाऊ शकत नाही. मात्र शिंदे गटाचे पदाधिकारी बनावट ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रात गेलेच कसे? दरम्यान यावेळी मोठागोंधळनिर्माणझालाअसूनवेळीच पोलीस घटनास्थळीपोहचूनत्यांनीहा गोंधळ शांत केला. यावेळी पोलिसांनी रवींद्र महाडीक यांना ताब्यात घेतले. तर तुषार काते आणि लक्ष्मण पांढरे त्याठिकाणाहून पळून गेल्याचेबोललंजातआहे.
Shivsena vs Shivsena UBT: शिंदे गटाचा कार्यकर्ता मतदान केंद्रात शिरला, आमच्याकडे लाइव्ह व्हिडिओ
वॉर्ड क्रमांक 153 मध्ये आरोपी रवींद्र शंकर महाडिक हा शिंदे गटाचा कार्यकर्ता असून पदाधिकारी आहे. रात्री साडे बारा वाजता हा आतमध्ये गेला होता, त्याचा लाइव्ह व्हिडिओ आमच्याकडे आहे. त्याला आतमध्ये कसा प्रवेश मिळाला? प्रशासन काय करते? पोलीस काय करत आहे. पणत्या वाटून झाल्या, पैसे वाटून झाले. हा बाजार डोळ्यासमोर दिसतोय. प्रशासन आणि पोलीस ढिम्म आहे, पोलीस आम्हाला सहकार्य करत नाहीत. असाआरोप ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्याकार्यकर्त्यांकडूनकरण्यातआलाय.
BMC Election 2026: शिंदेच्या शिवसेनेकडून पैसे वाटप केल्याचा आरोप
चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून लावण्यात आलाय. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्या सुन तन्वी काते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी हा आरोप लावला आहे. दरम्यान, दुपारच्या सुमारास चेंबूर खारदेवनगर येथील चाळीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन पैसे वाटण्यात आले आणि या दरम्यान पैसे वाटणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी पप्पू भाटी याला पोलिसांनी पकडलं आहे. दरम्यान, पैसे वाटतानाचा व्हिडिओ हा चाळींमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय. या संदर्भातील रीतसर तक्रार पत्र ठाकरे गटाच्या उमेदवार मीनाक्षी पाटणकर यांच्याकडून निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
