मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनसेची युती झालेली आहे. महायुतीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार की फक्त भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या दरम्यान अखिलेश यादव यांच्या समाजवादीपार्टीनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. समाजवादीपार्टीच्या पहिल्या यादीत 21 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात ली आहे.

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रप्रदेशाध्यक्षअबूआझमी यांच्या निर्देशानुसार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. समाजवादीपार्टीच्यामेराजसिद्दीकी यांनी पक्ष मुंबईतील सर्व वॉर्डमध्येताकदीनं निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. समाजवादीपार्टीकडून लवकरच इतर वॉर्डमधील उमेदवारांची नावं जाहीर केली जाणार आहेत.

समाजवादीपार्टीच्या पहिल्या यादीत कोणाला संधी?

1.वॉर्ड 20 मोहम्मद अजहरुद्दीनसिद्दीकी

2.वॉर्ड 64 डॉ. शीला अखिलेश यादव

3.वॉर्ड 90 सना अब्बास कुरैशी

4.वॉर्ड 96 सुभाष शेख शब्बीर

5.वॉर्ड 134 शायरशाहबाजमी

6.वॉर्ड 135 शहबाजसबीर शेख

7.वॉर्ड 136 रुबाबानाजसिद्दीकी

8.वॉर्ड 137 अहदयुनूसकुरशी

9.वॉर्ड 140 आप्पातीविद्यासागरडावर

10.वॉर्ड 141 जायदइमरानुल्लाकुरशी

11.वॉर्ड 142 ज्योत लक्ष्मण गुडे

12.वॉर्ड 143 आयेशारहमतुल्लासरदार

13.वॉर्ड 148 साक्षीसुनीलकुमारयादव

14.वॉर्ड 174 डॉ. आरामाठाक

15.वॉर्ड 181 मोहम्मदआदिलमुमताजशेख

16.वॉर्ड 188 गौसमोहिउद्दीनलतीफ

17.वॉर्ड 201 इरफानसाजिदअहमदसिद्दीकी

18.वॉर्ड 212 अमरीनशहज़ादअब्दुल्ला

19.वॉर्ड 213 डोमिनिकमलिक

20.वॉर्ड 220 गुलाममखदूरी

21.वॉर्ड 224 रुखसाना जाफर टीमवाला 

मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती जाहीर केली आहे. दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनी युती म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भाग असणार की नाही हे देखील स्पष्ट झालेलं नाही. काँग्रेस देखील स्वबळावर निवडणूक लढणार आहे. 

मुंबई महापालिका निवडणूक वेळापत्रक

नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025

नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025

उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026

निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026

अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026

मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026

मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026