Nagpur Municipal Corporation Election 2026 : माझे पक्षश्रेष्ठी कधीही निर्णय घेऊन माघारी फिरत नाहीत. टाकलेलं पाऊल मागे घेत नाहीत, आणि त्यांच्याकडून शिकूनच मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. हे म्हणणं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या प्रभागातून बंडखोरी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचं. धीरज चव्हाण (Dhiraj Chavan) या संघ स्वयंसेवक आणि भाजप कार्यकर्त्यांने प्रभाग 18 मधून बंडखोरी केली आहे. मी माझ्या पक्षष्ठींकडूनच घेतलेल्या निर्णयावर कायम राहण्याचा गुण शिकलो आहे. म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गेले तीन दिवस मी उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय मागे घ्यायचा नाही, म्हणूनच आऊट ऑफ रेंज झालो होतो. माझा फोन बंद करून पक्षाच्या संपर्काबाहेर होतो. आज सकाळीच घरी परतलो असून प्रचार सुरू केला आहे, असेही धीरज चव्हाण म्हणाले.
Nagpur Election 2026 : गडकरींच्या प्रभागातून बंडखोरी करत धीरज चव्हाण शड्डूठोकणार
विशेष म्हणजे प्रभाग 18 मधून भाजपने सुधीर उर्फ बंडू राऊत आणि धीरज चव्हाण या दोघांना एबी फॉर्म दिले होते. यादी जाहीर होईपर्यंत श्रेष्ठींचा कोणाला उमेदवारी द्यावी, असा निर्णय न झाल्यामुळे नंतर मात्र पक्षाने प्रभाग 18 मधील ओबीसी प्रवर्गातून सुधीर उर्फ बंडू राऊत यांची उमेदवारी निश्चित केली, आणि धीरज चव्हाण यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले. मात्र धीरज चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. उलट प्रभाग 18 मधूनआता भाजप बंडखोर उमेदवार धीरज चव्हाण शड्डूठोकणारअसल्याचेस्पष्टझालेआहे.
Nagpur Election 2025 : गणेश चर्लेवारची उमेदवारी नागपुरात चर्चेचा विषय
महापालिकेत गेले दोन दशक चपराशी म्हणून नोकरी करणाऱ्याच्या मुलाला त्याच महापालिकेत नगरसेवक होण्याची संधी देण्यात आली आहे. सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रेशीमबाग प्रभागात भाजप शिवसेना युतीकडून गणेश चर्लेवार या अनुसूचित जातीच्या आणि अत्यंत गरीब तरुणाला उमेदवारी देण्यात आली आहे. परिणामी, व्हीव्हीआयपी नेत्यांच्या कुटुंबातील पॅराशुट उमेदवारांच्या या काळात गणेश चर्लेवारची उमेदवारी नागपुरात चर्चेचा विषय ठरली आहे.
Nagpur Election 2025 : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 992 उमेदवार रिंगणात
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नाव परत घेण्याची मुदत संपल्यानंतर आता 992 उमेदवार रिंगणात आहेत. 151 जागांसाठी 1294 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एक आणि दोन जानेवारी रोजी 302 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता 992 उमेदवार रिंगणात उरले आहेत.
आणखी वाचा
