Devendra Fadnavis In Ichalkaranji: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (3 जानेवारी) महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी इचलकरंजी (Devendra Fadnavis In Ichalkaranji) दौऱ्यावर असणार आहेत. उद्या दुपारी मुख्यमार्गावर फडणवीस यांचा रोड शो होणार असल्याची माहिती भाजप आमदार राहुल आवाडे यांनी दिली. हा रो शो राजश्री छत्रपती शाहू महाराज पुतळा येथून होणार आहे. त्यानंतर शिवतीर्थ, शंभूतीर्थ, महात्मा गांधी पुतळा राजवाडा चौक या मार्गावर हा रोड शो होणार आहे. त्याच ठिकाणी या रोड शोची सांगत होणार आहे. या दौऱ्याचे नियोजन करण्यासाओठी भाजप कार्यालयामध्ये बैठक पार पडली. या बैठकीसाठी संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे आदी उपस्थित होते. 

Continues below advertisement

रवींद्र चव्हाण कोल्हापुरात 

दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सुद्धा भाजपचा उद्या प्रचार शुभारंभ होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan In Kolhapur) उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांचा पहिल्यांदा कोल्हापूर दौरा असल्याने त्यांच्या स्वागताची तयारी कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी अशा दोन ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या निमित्ताने होणार आहे. रवींद्र चव्हाण कोल्हापूरमध्ये आगमन झाल्यानंतर अंबाबाई दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्यांची पदयात्रा होणार आहे. कोल्हापूर तसेच इचलकरंजी मनपात आपलाच महापौर व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहे. जागा वाटपामध्ये कोल्हापूरमध्ये भाजपाच मोठा भाऊ ठरला आहे. भाजपच्या वाट्याला 36 जागा असून शिवसेना शिंदे गट 30 जागा लढवत आहे, तर राष्ट्रवादी 15 जागांवर निवडणुकीच्या रिंगणात आहे. 

कोल्हापुरात तिरंगी लढत होणार

कोल्हापूरमध्ये महायुतीमध्ये एकमत झाला असून 81 जागांमध्ये भाजप मोठा भाऊ आहे. भाजप 36 जागांवर निवडणूक लढवणार असून शिवसेना 30 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळाल्या आहेत.  कोल्हापूरमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये फुट झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तिसऱ्या आघाडीसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्रित निवडणूक लढवत आहे. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार सर्वाधिक आहेत. दुसरीकडे तिसऱ्या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आम आदमी पक्ष आहे. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या