Amravati Municipal Corporation Election 2026 अमरावती : अमरावती महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 (ड) मधून रितेश नेभनानी हे अपक्ष निवडणूक लढवत असताना त्या ठिकाणी भाजपा (BJP) आणिरवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या (Yuva Swabhiman Party) युतीमध्ये ही जागा युवा स्वाभिमान पक्षाला दिली होती. मात्र, युवा स्वाभिमान पक्षानी स्वतंत्र उमेदवार दिल्याने अपक्ष उमेदवार रितेश नेभणानी यांना भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे.

Chandrashekhar Bawankule : थेट चंद्रशेखर बावनकुळेंचं भाजप समर्थित अपक्ष उमेदवाराला पत्र

दरम्यान, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल (शनिवार, 10 जानेवारी) रात्री उशिरा रितेशनेभनाणी यांना पत्र देऊन पाठिंबा दिलाय. त्यामुळे आता अमरावती प्रभाग क्रमांक 18 मध्ये रितेशनेभनानी हे भाजप समर्थित उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे. तर या ठिकाणी आता रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्षाचा उमेदवार आणि भाजपचासमर्थित उमेदवार यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. अमरावतीमध्ये भाजप आणि रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाची युती असताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल (शनिवार, 10 जानेवारी) रात्री उशिरा रितेशनेभनाणी यांना पत्र देऊन पाठिंबा दिल्याने नव्या राजकीय चर्चेला ऊत आला आहे. अमरावतीमध्ये रवी राणांनी 87 पैकी 41 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते.

दरम्यान, मतांचे विभाजन होऊन भाजपलाफटकाबसण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. परिणामी,संभाव्य धोका लक्ष्यात घेता बावनकुळे हे स्व:ता अमरावतीत दाखल झाले.या पूर्वी देखील त्यांनी याबाबत रवी राणांशी चर्चा करून या संदर्भात तोडगा काढण्याचे प्रयत्न केले आहे. अशातच आता या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने युवा स्वाभिमान पक्षाला एक प्रकारे धक्का दिल्याचे बोललं जात आहे.

Ravi Rana: रवी राणांची शहरात पदयात्रा, म्हणाले सचिन भेंडे यांचा विजय पक्का

अमरावतीतही आज प्रचाराचा 'सुपर संडे' आहेय. या प्रचाराच्या 'सुपर संडे'ला सर्वाधिक मोठी बिग फाईट आहे साईनगर प्रभागात. याठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीचे सचिन भेंडे आणि भाजपचे नेते तुषार भारतीय यांच्यात ही लढत होत आहे. आमदार रवी राणा यांनी पूर्ण ताकद या प्रभागात लावली असून आज त्यांनी प्रचार पदयात्रा काढून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी आमदार रवी राणा म्हणाले की साईनगर प्रभागाची निवडणूक जनतेनी आपल्या हातात घेतली आहे. त्यामुळे सचिन भेंडे यांचा विजय हा पक्का आहे.

संबंधित बातमी: