BJP News : विखे पाटलांविरुद्ध बैलगाडीतून जाऊन अपक्ष अर्ज भरला, भाजपनं बंडखोर नेत्याला मुंबईला बोलावलं, शिर्डीत विमान पाठवलं
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागत आहे.
अहिल्यानगर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपलेली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांपुढं नाराज नेत्यांनी केलेल्या बंडखोरीचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मविआ आणि महायुतीच्या नेत्यांचं बैठकांचं सत्र सुरु आहे. भाजपनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नीची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करायला बैलगाडीतून, आता भाजपनं विमान पाठवलं
शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पिपाडा यांनी बैलगाडीतून जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता राजेंद्र पिपाडा यांची समजूत काढण्यासाठी भाजप श्रेष्ठींनी खास विमान पाठवलं आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी रोखण्यासाठी भाजप कडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. भाजपचे राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नीने बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
आता भाजपकडून राजेंद्र पिपाडा यांची बंडखोरी शमवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. राजेंद्र पिपाडा यांना मुंबईत बोलावण्यात आलं आहे. राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या पत्नीला घेण्यासाठी भाजपकडून खास शिर्डीत स्पेशल चार्टड फ्लाईट पाठवण्यात आलं आहे. राजेंद्र पिपाडा विशेष विमानानं मुंबईकडे रवाना झाले आहेत.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत.गेल्या काही महिन्यांपासून राजेंद्र पिपाडा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करत होते. शिर्डी मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी मुंबईत दुपारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. राजेंद्र पिपाडा स्पेशल विमानाने मुंबईकडे रवाना झाले आहेत.
बंडखोरांसंदर्भात भाजपकडून विचारमंथनाला सुरुवात
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे आदेश डावलत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या बंडखोरांना शांत करण्यासाठी काय करायला पाहिजे यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात बंडखोरांसंदर्भात महत्त्वाची बैठक सुरु करण्यात आली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे आणि शिव प्रकाश, आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. बंडखोरी झालेल्या मतदारसंघांचा आढावा घेत चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पुढील चार दिवसांत स्थानिक नेतृत्वामार्फत बंडखोरांची समजूत काढली जाणार आहे.
इतर बातम्या :