मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीला 118 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपला 89 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागांवर यश मिळालं आहे. महायुतीच्या विजयानंतर मुंबईचा महापौर कोणाचा होणार? भाजपचा की शिवसेनेचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईत महायुतीत कोणतीही रस्सीखेच नाही, महापौर युतीचा होईल, असं म्हटलं आहे.  

Continues below advertisement

भाजपच्या मुंबईतील निवडून आलेल्या नगरसेवकांनी श्री श्री रविशंकर यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी श्री श्री रविशंकर यांनी मुंबई शहराला हॅपी सिटी केले पाहिजे त्यादृष्टीने मार्गदर्शन केलं. मुंबई शहराची सुरक्षा अबाधित ठेवण्याबाबत श्री श्री रविशंकर यांनी मार्गदर्शन केलं.  मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी आमच्यात रस्सीखेच वगैरे काही नाही. महायुतीचा महापौर विराजमान होईल, असंही साटम यांनी म्हटलं.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होईल. विरोधकांकडून  महापौरपदासाठी फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचे काम केले जात आहे, असं अमित साटम् म्हणाले. 

भाजप आणि शिवसेना आमचे एकमेकांमध्ये चांगले कोऑर्डिनेशन आहे. तशा पद्धतीने आम्ही समोर जाऊ, असं अमित साटम म्हणाले.   शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईच्या महापौर पदासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. मुंबईचा महापौर भाजपचा होऊ नये, असं संजय राऊत म्हणाले होते. अमित साटम यांनी संजय राऊत हे महाराष्ट्रातील राजकारणातील एनसी आहेत म्हणजेच नाॅन कॉग्निजेबल आहेत, असं म्हटलं.

Continues below advertisement

एकनाथ शिंदेंमुळे भाजपमध्ये नाराजी नसल्याचं देखील अमित साटम यांनी म्हटलं. कोणीही कोणता दबाव आणत नाही. फेक नॅरेटिव्ह विरोधकांकडून पसरवलं जातंय.  विरोधकांनी प्रचारात भूलथापा मारल्या आता पण भूलथापा मारत आहेत. त्यांच्या हाती भोपळा लागणार आहे, असं अमित साटम म्हणाले. 

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला काठावरील बहुमत मिळालेलं आहे. महायुतीला मुंबईत 118 जागांवर विजय मिळाला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालेलं नाही, त्यामुळं महापौर कोण होणार या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी आणखी काही काळ थांबावं लागेल.