Maharashtra BJP MP List 2019 vs 2024 : महाराष्ट्रातील 48 जागांचा निकाल हाती आला आहे. राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. पण भाजपप्रणित महायुतीची जोरदार पिछेहाट झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक फटका भाजपला बसलाय. 2019 च्या तुलनेत खूप मोठा फटका बसला आहे. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागले. भाजपला हक्काचे मतदारसंघही गमावावे लागले. 2019 आणि 2024 लोकसभा मतदारसंघात काय स्थिती होती, आता काय स्थिती झाली, भाजपला काय मिळालं... हे सर्व अतिशय सोप्या शब्दात समजून घेऊयात...

2024 मधील भाजपचे विजयी उमेदवार - 

मतदारसंघ विजयी उमेदवार
जळगाव स्मिता वाघ
रावेर रक्षा खडसे
अकोला अनुप धोत्रे
नागपूर नितीन गडकरी
पालघर डॉ. हेमंत सावरा
मुंबई उत्तर पियुष गोयल
पुणे मुरलीधर मोहोळ
सातारा उदयनराजे भोसले
रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले होते. भाजपला राज्यात तब्बल 23 जागांवर विजय मिळाला होता. पाहूयात संपूर्ण यादी.... 

नंदुरबार हिना गावित
धुळे सुभाष भामरे
जळगाव उन्मेष पाटील
रावेर रक्षा खडसे
अकोला संजय धोत्रे
वर्धा रामदास तडस
नागपूर नितीन गडकरी
भंडारा-गोंदिया सुनील मेंढे
गडचिरोली-चिमूर अशोक नेते
नांदेड प्रताप पाटील चिखलीकर
जालना रावसाहेब दानवे
दिंडोरी डॉ. भारती पवार
मुंबई-उत्तर गोपाळ शेट्टी
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) मनोज कोटक
मुंबई उत्तर मध्य पूनम महाजन
पुणे गिरीश बापट
अहमदनगर सुजय विखे
बीड डॉ. प्रीतम मुंडे
लातूर सुधाकरराव श्रंगारे
सोलापूर जयसिद्धेश्वर स्वामी
माढा रणजितसिंह नाईक निंबाळकर
सांगली संजयकाका पाटील
भिवंडी कपिल पाटील


2019 मध्ये जिंकले, पण 2024 मध्ये हरले - 

2019 च्या तुलनेत भाजपला 2024 च्या निवडणुकीत सपाटून मार खावा लागला. भाजपला फक्त 9 जागांवर विजय मिळवता आला. पण 2019 मध्ये जिंकलेल्या लोकसभा मतदारसंघात भाजपला 17 जागांवर पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. डॉ. भारती पवार, रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2019 मध्ये जिंकलेल्या पण 2024 मध्ये गमावलेल्या मतदारसंघाची यादी पाहूयात.....

2019 मधील 17 जागा 2024 मध्ये गमावल्या

मतदारसंघ उमेदवार 2024 कोण जिंकलं?
नंदुरबार हिना गावित गोवाल पाडवी
धुळे सुभाष भामरे शोभा बच्चाव
वर्धा रामदास तडस अमर काळे
भंडारा-गोंदिया सुनिल मेंढे डॉ. प्रशांत पडोळे
गडचिरोली-चिमूर अशोक नेते नामदेव किरसान
नांदेड प्रतापराव चिखलीकर वसंतराव चव्हाण
जालना रावसाहेब दानवे कल्याणराव काळे
दिंडोरी भारती पवार भास्कर भगरे
मुंबई-उत्तर मध्य उज्वल निकम वर्षा गायकवाड
अहमदनगर सुजय विखे निलेश लंके
बीड पंकजा मुंडे बजरंग सोनवणे
लातूर सुधाकर शृंगारे शिवाजीराव काळगे
सोलापूर राम सातपुते प्रणिती शिंदे
माढा रणजितसिंह निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील
सांगली संजयकाका पाटील विशाल पाटील
भिवंडी कपिल पाटील बाळ्यामामा म्हात्रे
मुंबई ईशान्य मिहीर कोटेजा संजय दिना पाटील

2024 मध्ये भाजपला मिळालेले नवे मतदारसंघ - 

भाजपला या लोकसभा निवडणुकीत तीन नव्या मतदारसंघात विजय मिळवलाय. रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांनी शिवसेनेच्या विनायक राऊत यांचा पराभव केला. तर साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांना धूळ चारली. पालघरमध्ये हेमंत सावरा यांनी विजय मिळवला. पाहूयात भाजपनं 2024 मध्ये नव्याने विजय मिळवलेले मतदारसंघ ---

रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे
सातारा उदयनराजे भोसले
पालघर डॉ. हेमंत सावरा

2024 मध्ये भाजपचा दारुण पराभव - 

2024 मध्ये भाजपनं महाराष्ट्रात सर्वाधिक 48 जागांवर उमेदवार उतरवले होते. पण भाजपला 19 जागावर पराभवाचा झटका बसला. जालना, धुळे, भिवंडी, सांगली, बीड, अहमदनगर , भंडारा यासारख्या हक्काच्या मतदारसंघात भाजपला पराभवाची चव चाखावी लागली. पाहूयात 2024 मध्ये भाजपचे पराभूत झालेले उमेदवारांची यादी... 

उमेदवार मतदारसंघ
गोवाल पाडवी नंदुरबार
सुभाष भामरे धुळे
रामदास तडस वर्धा
सुनिल मेंढे भंडारा-गोंदिया
अशोक नेते गडचिरोली-चिमूर
प्रतापराव चिखलीकर नांदेड
रावसाहेब दानवे जालना
भारती पवार दिंडोरी
उज्वल निकम मुंबई-उत्तर मध्य
सुजय विखे अहमदनगर
पंकजा मुंडे बीड
सुधाकर शृंगारे लातूर
राम सातपुते सोलापूर
रणजितसिंह निंबाळकर माढा
संजयकाका पाटील सांगली
कपिल पाटील भिवंडी
मिहीर कोटेजा मुंबई ईशान्य
नवनीत राणा अमरावती
सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर