Chandrapur Mahanagarpalika Election 2026 Results चंद्रपूर : शिवसेना ठाकरेगटाला कुठल्याही परिस्थितीत महापौर पद देणार नाही, वेळ पडली तर भाजप (BJP) विरोधी पक्षात बसेल, अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनीघेतलीय. शिवसेनेच्या महापौर पदाच्या मागणीवर त्यांनीहिरोखठोक भूमिका बोलतानाव्यक्तकेलीय. तुम्ही जर भाजपचा महापौर बनवत असाल तर आम्ही तुमच्या सोबत यायला तयार असल्याचं अनेक नगरसेवकांनी म्हंटलं आहे, शिवसेना ठाकरेगटासोबत देखील 2 वेळा चर्चा झाली आहे, आणि पहिल्या भेटीतच महापौर पद कोणालाही देता येणार नाही, हे आम्ही शिवसेनेला स्पष्ट सांगितल्याचं आणि चंद्रपूर शहराच्या विकासासाठी महापौर भाजपचाच करावा लागेल, असं सुधीर मुनगंटीवार यांचं म्हणणंआहे. (Chandrapur Municipal Election)

Chandrapur Mahanagarpalika Election 2026: जो आमचा महापौर करेल आम्ही त्याच्यासोबत जायला तयार

दुसरीकडे, जो आमचा महापौर करेल आम्ही त्याच्यासोबत जायला तयार आहोत. असंम्हणत शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी भाजपसोबत जाण्याचे स्पष्ट संकेत दिलेहोते. त्याव भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीप्रतिक्रियादेतभाष्यकेलंआहे. चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेना उबाठा यांच्यात चर्चेची प्राथमिक फेरी झाली. शिवसेना उबाठा गटाने आमचा महापौर केल्यास भाजपसोबत चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली आहे. शिवसेनेच्या या ऑफरमुळे काँग्रेसवर देखील दबाव वाढू शकतो.

शिवसेना उबाठा भाजपसोबत गेल्यास काँग्रेसचा हाता-तोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजप शिवसेना उबाठाला महापौर पद देणार का? याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंहोतं. त्यातचआता शिवसेना ठाकरेगटाला कुठल्याही परिस्थितीत महापौर पद देणार नाही, वेळ पडली तर भाजप विरोधी पक्षात बसेल, अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीघेतलीय.

Chandrapur Municipal Election: चंद्रपुरात भाजपच्या माजी महापौर- उपमहापौरांचा पराभव

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला मोठं यश आलं आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या होमपीचवर भाजपला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागतंय. अशातच, या निवडणुकीत भाजपच्या दोन्ही माजी महापौर राखी कंचर्लावार आणि अंजली घोटेकर या देखील पराभूत झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे दोन्ही माजी उपमहापौर संदीप आवारी आणि अनिल फुलझले देखील पराभूत झाले आहेत. त्यामुळे चंद्रपुरात भाजपला पुन्हा एका पराभवाला समोर जावं लागतंय. दुसरीकडे मात्र विजय वडेट्टीवारांनी काँग्रेसचा गड राखलाय.

Chandrapur Election 2026 Results : महापालिका नाव - चंद्रपूर

पक्षनिहाय विजयी उमेदवार (16 प्रभागांचे निकाल घोषित)

भाजप - 23शिवसेना - 1काँग्रेस - 28शिवसेना (उबाठा) UBT - 6BSP - 1वंचित आघाडी  - 1MIM - 1Independent - 2NCP SP - 

NCP AP- MNS -

इतर महत्वाच्या बातम्या