चंदीगड: उत्तरेकडील हरियाणा राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीच्या पहिल्या तीन तासानंतर भाजपनं आघाडी घेतली आहे. भाजपनं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार 48 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, काँग्रेसनं 36 जागांवर आघाडी घेतलीय. भारतीय लोकलदाचा एक उमेदवार आघाडीवर असून 5 जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत. भाजप सध्या आघाडीवर असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल विज चौथ्या फेरी अखेर पिछाडीवर आहेत. 


हरियाणातील अंबाला छावणी मतदारसंघातून अनिल विज निवडणूक लढत आहेत. या ठिकाणी त्यांच्या विरोधात परविंदर पाल परी आणि अपक्ष उमेदवार चित्रा सरवरा निवडणूक लढत आहेत. चौथ्या फेरीच्या मतमोजणीपर्यंत अनिल विज दुसऱ्या स्थानावर आहेत. अपक्ष उमेदवार चित्रा सरवरा आघाडीवर असून काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानी आहे. 


चौथ्या फेरीच्या मतमोजणीपर्यंत अनिल विज दुसऱ्या स्थानावर आहेत. अपक्ष उमेदवार चित्रा सरवरा आघाडीवर असून काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानी आहे. अनिल विज यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा बोलून दाखवली होती.  मतमोजणीत सध्या तिसऱ्या स्थानावर आहेत. अनिल विज यापूर्वी सहा वेळा आमदार झालेले आहेत. मनोहरलाल खट्टर यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते.  


मनोहरलाल खट्टर हे मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर अनिल विज यांना पुन्हा संधी देण्यात आली नव्हती. अनिल विज हे सातव्यांदा निवडणूक लढवत असले तरी त्यांना यावेळी संघर्ष करावा लागत असल्याचं चित्र आहे. 


अंबाला विधानसभा मतदारसंघात 64 टक्के मतदान झालं आहे. 2019 मध्ये देखील अनिल विज यांनी चित्रा सरवरा यांना पराभूत केलं होतं. यावेळी देखील त्या दोघांमध्ये लढत होत आहे. चित्रा सरवरा यांचे वडील निर्मला सिंह अंबाला शहर मतदारसंघामधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. ते त्या मतदारसंघातून आघाडीवर आहेत. 


हरियाणामध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार?


हरियाणा विधानसभा निवडणुकीतील कलांनुसार सध्या भाजप आघाडीवर आहे. काँग्रेसच्या जागांमध्ये गतवेळच्या तुलनेत वाढ असल्याचं चित्र आहे. मात्र, ते सत्ता स्थापन करण्यापासून ते दूर आहेत. भाजप आघाडीवर असलेल्या जागांची संख्या बहुमतापेक्षा अधिक आहे. त्यामुळं हेच कल निकालात परावर्तित झाल्यास भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. हरियाणामध्ये काँग्रेसकडून जोरदार लढत देण्यात आली होती मात्र मतमोजणीतून दिसणाऱ्या निकालात परिणाम दिसत नाही.


इतर बातम्या :


Haryana Elections Results 2024: भाजपने अशक्य ते शक्य करुन दाखवलं? हरियाणात 50 जागांवर आघाडी, तिसऱ्यांदा भगवं सरकार येणार?


Haryana Election Results: ऑलिम्पिकमध्ये अपात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश, थेट हरियाणाच्या निवडणुकीत उतरली; विनेश फोगाट आघाडीवर की पिछाडीवर?