Thane Mayor: मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये काठावरचं बहुमत मिळाल्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत आपला महापौर करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आपला महापौर करण्यासाठी हटून बसल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिका निवडणूक निकालानंतर  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व नगरसेवक मुंबईमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये शिफ्ट केले. त्यामुळे हॉटेल पॉलिटिक्सची चर्चा जोरात सुरू झाली आहे. शिंदे यांनी मुंबई महापौर पदाससह विविध समित्यांमध्ये समान वाटा मागितला आहे. मात्र, त्याला भाजपचा कडाडून विरोध असल्याची चर्चा आहे. कोणत्याही स्थितीत शिंदेंचा दबाव सहन केला जाणार नाही अशा स्थितीमध्ये भाजप असल्याची चर्चा सुद्धा रंगली आहे. 

Continues below advertisement

भाजपकडूनही ठाण्यात डाव टाकण्यास सुरुवात

दरम्यान, मुंबईमध्ये शिंदे गटाने दबावतंत्र वाढवल्यानंतर भाजपकडूनही ठाण्यात डाव टाकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता ठाण्यामध्ये पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळे आता शिंदे भाजप विरोधात मुंबईमध्ये हटून बसले असतानाच  बालेकिल्ल्यांमध्ये भाजपच्या मागण्या समोर आल्या आहेत. भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्यामध्ये अडीच वर्षे महापौर पद मिळावं अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर स्थाही समिती चेअरमन पद आणि सभागृह नेतेपद देखील काही वर्षांसाठी मिळावं अशी मागणी भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. 

एकनाथ शिंदे निर्णय घेतील

दुसरीकडे, त्यांच्या या मागणीनंतर शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही युतीत असल्याने आमची मानसिकता होती. जर त्यांनी सर्व पद मागितली तर आम्ही देऊ याबद्दल आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे निर्णय घेतील असं मस्के यांनी म्हटलं आहे. ठाण्यात देखील काही पदांची वाटणी करावी लागेल, असं नरेश मस्के यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

भाजपचा ठाण्यामध्ये 100 टक्के स्ट्राईक रेट

निरंजन डावखरे यांनी सांगितलं की, ठाण्यामध्ये महापौरपद भाजपला मिळावं. भाजपचा ठाण्यामध्ये 100 टक्के स्ट्राईक रेट आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आहे, त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे क्रेडिटसाठी बॅनर लागले असल्याचे डावखरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, निश्चितपणे जर आम्हाला निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द पूर्ण करायचे असेल, तर महानगरपालिकेमध्ये महत्त्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोड मॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केला आहे, त्यामध्ये कुठेतरी अडचणी येतील, असे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या