Nagpur Municipal Corporation Election 2026 : राज्यातसध्यामहापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरुआहे. मतदानासाठी आताअवघ्याकाही दिवसांचाअवधीशिल्लकराहिल्यानेप्रचारालाहीवेगप्राप्तझालाआहे. राज्यातीलअनेकप्रभागातबिनविरोधनिवडणूकझालीअसूनत्यावरूनराजकारणदेखीलतापलंआहे. असेअसताना नागपूरच्या प्रभाग 26 मध्ये दोन सख्खे भाऊ निवडणुकीच्या मैदानात एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहे. भाजपनं प्रभाग 26 मधील अनुसूचित जाती प्रवर्गासाठीच्या जागेवरून ॲड. धर्मपाल मेश्राम(Adv.Dharampal Meshram) यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून धर्मपाल मेश्राम यांचे सख्खे मोठे भाऊ ॲड. यशवंत मेश्राम (Adv Yashwant Meshram) निवडणूक लढवत आहेत. (Adv.Dharampal Meshram vs Adv. Yashwant Meshram)

विशेष म्हणजे दोघेही अनुभवी राजकारणी असून नागपूर महापालिकेत नगरसेवक राहिले आहे. दोघांचे घर ही अगदी शेजारी शेजारी असून सध्या दोन्ही घरातून निवडणुकीचे डावपेच आखले जात आहेत. एवढेच नाही तर परिसरातील काही लोक कमळचा प्रचार करत आहेत. तर काहीजण हातावर घड्याळ बांधून प्रचाराला उतरले आहेत. त्यामुळे दोन सख्ख्या भावांमधील ही राजकीय लढत नागपुरात लक्षवेधी ठरत आहे.

Nagpur Election 2026  : कौटुंबिक नव्हे तर पूर्णपणे वैचारिक आणि राजकीय लढाई

दरम्यान, याबाबतबोलतानादोन्हीभावांनीएकमेकांवरआरोप केले. ही कौटुंबिक नव्हे तर पूर्णपणे वैचारिक आणि राजकीय लढाई असल्याचे मत दोघांनी व्यक्त केले आहे. लहान भाऊ धर्मपाल मेश्राम यांनी स्वतःची बांधिलकी भाजपसोबत घट्ट असल्याचे सांगत त्यांनी मोठ्या भावासारखे वारंवार पक्ष बदलले नसल्याचा दावा केला आहे. तर मोठे भाऊ यशवंत मेश्राम यांनी लहान भावावर मतदारांकडे, प्रभागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

Nagpur Election 2026 : गणेश चर्लेवारची उमेदवारी नागपुरात चर्चेचा विषय

नागपूरच्या प्रभाग 31 म्हणजेच रेशिमबाग प्रभागातून अति सामान्य कुटुंबातील गणेश चर्लेवार (Ganesh Charlewar) या अनुसूचित जातीच्या स्वंयसेवकाला महायुतीची (BJP-Shiv Sena Alliance) उमेदवारी मिळाली आहे. महापालिकेत गेले दोन दशक चपराशी म्हणून नोकरी करणाऱ्याच्या मुलाला त्याच महापालिकेत नगरसेवक होण्याची संधी देण्यात आली आहे. सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रेशीमबाग प्रभागात भाजप शिवसेना युतीकडून गणेश चर्लेवार या अनुसूचित जातीच्या आणि अत्यंत गरीब तरुणाला उमेदवारी देण्यात आली आहे. परिणामी, व्हीव्हीआयपी नेत्यांच्या कुटुंबातील पॅराशुट उमेदवारांच्या या काळात गणेश चर्लेवारची उमेदवारी नागपुरात चर्चेचा विषय ठरली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या