नागपूर : रामटेक विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)अशी लढाई इथे आहे. तर महाविकास आघाडी म्हणून विशाल बरबटे हे नक्कीच जिंकणार आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी येथे बंडखोरी केलीय. लोकसभा निवडणूकीत या भागात काँग्रेसच्या उमेदवाराला रक्ताचं पाणी करुन जिंकून आणलं, पक्ष बघीतला नाही. रामटेकची (Ramtek Assembly Constituency) जागा शिवसेनेची होती, मात्र एका शब्दात पक्षप्रमुखांनी ती जागा काँग्रेसला दिली. मी इथे बरबटे यांचा प्रचार करायला आलोय. तर इथे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बंडखोरी करताय. तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरी मागे सुनील केदार आहेत. राजेंद्र मुळक यांचा अर्ज भरायला जातो. तुम्ही माणसं आहात की जनावरं आहेत. रामटेकच्या जागे बाबत काँग्रेसने विश्वासघात केलाय अशा तीव्र शब्दात राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय.
सुनील केदार यांनी छत्रपतींसमोर दिलेला शब्द तुम्ही तोडला
पूर्व विदर्भातील एक जागा रामटेकची आम्ही लढवली. एक जागा लढवावी येवढीच आमची ताकद आहे का? शिवसेनेसोबत टक्कर घेणाऱ्याला माती दाखवलीय. शिवसेनेच्या स्वाभिमानाला धक्का लावू नका. एकदा शिवसैनीक पेटून उठला तर तो कुणाच्या बापाला ऐकणार नाही. सुनील केदार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर शब्द दिली की, सहाही जागा महाविकास आघाडीच्या जिंकू. छत्रपतींसमोर दिलेला शब्द तुम्ही तोडला. राजेंद्र मुळक यांना सुनील केदार यांनी कामठीतून का उभं केलं नाही? सुनील केदार यांच्यावर बँकेच्या घोटाळ्याचे आरोप आहे. सुनील केदार यांनी सावनेरची जागा पत्नीला देण्याऐवजी राजेंद्र मुळक यांना का दिली नाही? तेव्हा तुम्ही नेता म्हणून तुमचं कौतुक केलं असतं. मात्र, नियती सुनील केदार यांना धडा शिकवणार. काँग्रेसच्या लोकांना विनंती इथे व्यक्ती नाही महाविकास आघाडी मोठी आहे.असेही भास्कर जाधव म्हणाले.
काँग्रेसने विश्वासघात केलाय- भास्कर जाधव
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुनील केदार यांना मंत्री होता येत नाही. म्हणून सुनील केदार यांच्या पोटात पाप आहे. की स्वत: मंत्री होता येत नाही म्हणून महाविकास आघाडीचं सरकार येऊ नये, म्हणून तो प्रयत्न करु. अनेक मतदारसंघात त्यांचे हे प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांचा हेतू चांगला नाही. काँग्रेसने विश्वासघात केला. राजेंद्र मुळक यांना शोकेसमधून बाहेर काढल्यासारखा आहे. अशी टीकाही भास्कर जाधव काँग्रेसवर केली आहे.
हे ही वाचा