Bengal Election Result 2026 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. फाल्टा मतदारसंघ वगळता उर्वरित २९३ जागांसाठी मतांची मोजणी सुरू आहे. दुपारी सुमारे १२ वाजेपर्यंत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे. सध्या २९३ जागांवरील प्रारंभिक कल हाती आले आहेत. यंदा सर्वात मोठा प्रश्न असा (Bengal Election Result 2026) आहे की, तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आपली सत्ता कायम ठेवू शकेल का, की भाजपला राज्यात पहिल्यांदाच सत्ता मिळवण्यात यश येईल? सध्याच्या घडीला दोन्ही पक्षांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. तर १५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावत भाजपची तृणमूलसोबत चुरशीची लढत दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी भवानीपूरमधून पिछाडीवर आहेत.(Bengal Election Result 2026)

Continues below advertisement

Bengal Election Result 2026 :  पश्चिम बंगाल निकाल : आतापर्यंतच्या कलांवरुन निकालाची वैशिष्ट्ये

- भाजपाची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल, - भाजप इतिहासात पहिल्यांदाच सत्ता स्थापन करण्याची चिन्हं- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत: पिछाडीवर, - सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचीही पिछेहाट- भाजप नेते सुवेंदू अधिकारींच्या नेतृत्त्वात भाजप आघाडीवर - मोदींनी जिथे झालमुडी खाल्ली, तिथे भाजप उमेदवार आघाडीवर

Bengal Election Result 2026 : ममता बॅनर्जी यांच्या सरकारला १५ वर्षांनंतर सुरूंग लागणार

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांमधील कल राज्यात भाजप सरकार स्थापन होण्याचे संकेत देत आहेत. भाजपने १५७ जागांवर आघाडी घेतली आहे, तर टीएमसी ११५ जागांवर आघाडीवर आहे.

Continues below advertisement

Bengal Election Result 2026 : भाजप-तृणमूलमध्ये थेट संघर्ष

या निवडणुकीत भाजपने १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या टीएमसीविरोधातील नाराजीचा मुद्दा जोरदारपणे उचलला आहे. आरजीकर बलात्कार प्रकरण आणि कस्बा लॉ कॉलेजसारख्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा गाजला असून त्याचा दबाव टीएमसीवर वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते, शहरी आणि सुशिक्षित मध्यमवर्गातील मतदारांचा रोष टीएमसीविरोधात दिसून येत असून त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.

दुसरीकडे, १५ वर्षांपासून सत्तेत असलेली तृणमूल काँग्रेस मजबूत संघटन आणि पायाभूत आधारामुळे अजूनही प्रभावी स्थितीत आहे. ग्रामीण भागात ‘लक्ष्मी भंडार’ योजनेची लोकप्रियता पक्षासाठी फायद्याची ठरत आहे. तसेच मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळाल्याने टीएमसीने आपली गमावलेली जमीन काही प्रमाणात परत मिळवल्याचे मानले जात आहे. काही एक्झिट पोल वगळता बहुतांश सर्वेक्षणांमध्ये भाजप सरकार स्थापन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

Bengal Election Result 2026 : भाजप आघाडीवर असून राज्यात आमचे सरकार येणार; भाजप नेत्यांचे दावे

भाजपचे राज्यसभा खासदार राहुल सिन्हा यांनी दावा केला की, “भाजप आघाडीवर असून राज्यात आमचे सरकार येणार आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व घेईल.” त्यांनी ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून पराभूत होतील, असा दावाही केला.भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनीही विजयाचा विश्वास व्यक्त करत, “आम्ही भवानीपूरमध्ये जिंकू. दहा फेऱ्यांनंतर स्पष्ट आघाडी दिसेल. यावेळी हिंदू मतदारांनी एकतर्फी मतदान केले असून मुस्लिम मतांमध्ये विभाजन झाले आहे,” असे सांगितले.

Bengal Election Result 2026 : कलांनुसार भाजप आघाडीवर

सध्याच्या कलांनुसार भाजपने १५७ जागांवर आघाडी घेतली असून तृणमूल काँग्रेस ११५ जागांवर पुढे आहे. त्यामुळे १५ वर्षांनंतर ममता बॅनर्जी यांच्या सरकारला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.