पुणे: आज पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Baramati Bypoll Election 2026) मतमोजणी पार पडत आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीची (Baramati Bypoll Election 2026)मतमोजणी देखील सुरू झाली आहे, बारामती पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर होणाऱ्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह 23 उमेदवार रिंगणात आहेत. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. बारामती एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात ही मोजणी पार पडत आहे. सुरुवातीला 8 वाजता पोस्टल मतदान मोजलं गेलं, यामध्ये देखील सुनेत्रा पवार आघाडीवर होत्या अशी माहिती समोर आली आहे, त्यानंतर पोस्टल मतमोजणी झाल्यानंतर 8.30 वाजता ईव्हीएमची EVM मोजणी साडेआठ सुरू झाली, पहिल्या फेरीनंतर सुनेत्रा पवार साडे सहा हजार मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे.(Baramati Bypoll Election 2026)
Baramati Bypoll Election 2026: पोटनिवडणुकीत त्यांचा विक्रमी मतांनी विजय होणार अशी शक्यता
बारामतीमध्ये पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीने आवाहन केलं होतं, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील सुरूवातीपासून ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका घेतली होती, त्यानंतर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसने आपला उमेदवार दिला होता, पण चर्चा, बैठका आणि फोनाफोनी नंतर त्यांच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला, मात्र तरीदेखील अपक्ष आणि इतर काहींनी बारामती पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे, पण सर्व पक्षांनी आणि संघटनांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केल्याने या पोटनिवडणुकीत त्यांचा विक्रमी मतांनी विजय होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. मतमोजणीच्या सुरूवातीलाच मिळालेली साडे सहा हजारांची आघाडी यावरून देखील सुनेत्रा पवारांचा विजय होणार असं बोललं जात आहे. (Baramati Bypoll Election 2026) तर दुसऱ्या फेरीअंती सुनेत्रा पवार 16 हजार 543 मतांनी आघाडीवर आहेत.
बारामती पोटनिवडणूक पहिला कल
पहिल्या फेरीत
सुनेत्रा पवार 8828 मते
करुणा मुंडे 10 मते
अभिजीत बीचुकले 7 मते
नोटा 28
Baramati Bypoll Election 2026: बारामतीचा निकाल एकतर्फी
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडत आहे. त्यामुळे बारामतीत भावनिक वातावरण आहे, या निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवार आहेत. बारामतीमधून सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्याचबरोबर सर्व संघटना, पक्ष आणि बड्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दर्शवल्याने बारामतीची निवडणूक एकतर्फी असल्याचं दिसत आहे. सुनेत्रा पवारांचं पारडं जड असून त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. मात्र त्या किती मताधिक्यानं निवडून येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
