Asaduddin Owaisi : सत्ताधारी मुंबईत बसून एकत्र वडापाव खातात आणि निवडणुका आल्या की वेगवेगळे होतात, असे म्हणत एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. सत्ताधाऱ्यांचा कचरा उचलून फेका. तेव्हाच मालेगावची प्रगती होईल. कचरा कंत्राट यांच्याकडेच आहे. त्यांना कचऱ्यासारखे उचलून फेका, असे आवाहन त्यांनी मालेगावातील जनतेला केले आहे.  मालेगाव (Malegaon) येथे आयोजित एमआयएमच्या (MIM) उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. 

Continues below advertisement

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, मालेगाव पॉवरलूममध्ये अनेक अडचणी सुरू आहेत. अमेरिका टॅरिफमुळे अनेक अडचणी पॉवरलूम इंडस्ट्रीजवर येत आहेत. 15 वर्षे विरोधकांनी लूटमार केली. त्यांना निवडून देऊ नका. सफाईचे कंत्राट कोणाकडे आहे? एमआयएमला निवडून द्या. सत्ताधाऱ्यांचा कचरा उचलून फेका. तेव्हाच मालेगावची प्रगती होईल. कचरा कंत्राट यांच्याकडेच आहे. त्यांना कचऱ्यासारखे उचलून फेका. मालेगाव साफ ठेवायचे असेल तर एमआयएमला साथ द्या, असे आवाहन त्यांनी मालेगावकरांना केले. 

Asaduddin Owaisi : अजित पवार शरद पवारांचे झाले नाही ते तुमचे काय होतील?

अब्दुल मलिक हे महापौर बनवा. सगळे काम व्यवस्थित होईल. शाळा, रस्ते, पाणी सगळे कामे होते. अजित पवार तुमचा इथला प्यादा चारों खाने चित होईल. अजित पवार जे शरद पवारांचे झाले नाही ते तुमचे काय होतील. अजित पवार यांनी भाजप विरोधात एक वाक्य बोलले तर संध्याकाळपर्यंत थुंकी गिळून ते मागे गेले.  अजित पवार इथला तुमचा प्यादा आमचे काहीच करू शकत नाही, असे म्हणत त्यांनी नाव न घेता आसिफ शेख यांच्यावर निशाणा साधला. 

Continues below advertisement

Asaduddin Owaisi : मुंबईत बसून एकत्र वडापाव खातात अन् निवडणुका आल्या की...

असदुद्दीन ओवैसी पुढे म्हणाले की,  मालेगाव महापालिकेचे बजेट मोठे आहे, हे पैसे कुठे जातात? सत्ताधारी रक्त पिण्याचे काम करत आहे. तीन वर्षात महापालिका सुधारली जाईल. मालेगावात व्हिजन प्लांट तयार करण्यात येईल. महाराष्ट्रात सत्ताधारी सध्या वेगवगेळे आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार.... सत्ताधारी मुंबईत बसून एकत्र वडापाव खातात आणि निवडणुका आल्या की वेगवेगळे होतात, असे म्हणत त्यांनी सत्ताधारांवर निशाणा साधला.

Asaduddin Owaisi : एमआयएमला साथ द्या

भाजपचा एक नेता बनावट जन्म दाखल्याप्रकरणी मालेगावला बदनाम करतो आहेत. आपला महापौर बसला की त्याचा पण  हिसाब होईल. बिहारमध्ये एक डॉक्टरचे प्रकरण झाले. मुळात सरकारमध्ये मुस्लिमांची संख्या कमी आहे.  त्यामुळे शिक्षण घ्या, तुमच्यासाठी एमआयएम लढत आहे. महिलांना त्रास आहे, मुलांना त्रास आहे, शाळा नीट नाही. 15 वर्षापासून मालेगावात गुंडाराज आहेत. त्यांचा गुंडाराज कमी करायचा आहे. त्यामुळे एमआयएमला साथ द्या, असे देखील असदुद्दीन ओवैसी म्हणाले. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Imtiaz Jaleel : भाजपसोबतच्या युतीवरून असदुद्दीन ओवैसींनीही खडसावलं; इम्तियाज जलील म्हणाले, आम्ही कायम विरोधातच, माहिती घेऊन कारवाई होणार