Asaduddin Owaisi जालना : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रचार सभामधून नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसताय. अशातच एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी(Asaduddin Owaisi)यांनी परभणी (Parbhani Municipal Corporation Election) आणि जालन्यातील (Jalna) सभेत नथुराम गोडसेबद्दल (Nathuram Godse) एक अतिशय वादग्रस्त विधान केलंय. 'नथुराम गोडसे माणसात नव्हता, तशीच सवय तुम्हाला लागली आहे, अशा शब्दांत ओवेसींनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. (Asaduddin Owaisi Controversial Statement)

Continues below advertisement

दुसरीकडे, परभणीतील सभेत बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले कि, आमच्या बरबादीची दास्तान हे लोक लिहितात आणि सांगतात आम्ही सेक्युलर आहोत. मात्र नथुराम गोडसे हा टुई होता. इथे नाही बोलता येत, त्यालाही कपडे पाहण्याचा नाद होता. त्याच्याच या औलादी आहेत. त्यांचेच विचार हे लोक घेवून आलेत असेही ओवेसी म्हणाले आहेत.विरोधकांवर हल्ला चढवताना त्यांनी केलेल्या या विधानामुळे नवा राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

Asaduddin Owaisi on Congress:  MIM भाजपची बी टीम, म्हणणाऱ्या काँग्रेसवर ओवेसींचा जोरदार हल्लाबोल

Continues below advertisement

परभणी महानगरपालिकेतील MIM च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी MIMचे प्रमुख असदोद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी ओवेसी यांनी MIM ही भाजपची बी टीम असल्याचा प्रचार काँग्रेस करत असल्याने अनेक उदाहरण देवून ओवेसीनी काँग्रेसवर जोरदार शरसंधान साधले आहे. एवढेच नाही तर राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि काही अपक्षांचा ही जोरदार समाचार घेतलाय.

Asaduddin Owaisi: दोन मिनिटे द्या, तुमच्या अन्यायाचा पाढा मी नेहरूपासून ते मनमोहन सिंगपर्यंत द्यायला तयार

शहरातील दर्गाह रोडवरील मैदानावर ओवेसींची सभा पार पडली. या सभेला मोठ्या संख्येने मुस्लिम तरुण-तरुणी तसेच मुस्लिम समाज बांधव सहभागी झाला होता. यावेळी बोलताना ओवेसींनी मोदी 3 वेळा काय मुस्लिम समुदायामुळे पंतप्रधान झाले का? असा सवाल काँग्रेसला विचारलाय. तुम्हाला त्यांना हरवता येत नाही आणि माझे नाव घेवून ओरडता, तर ओरडा. बिहारमध्ये केवळ 5 जागा मागितल्या त्या दिल्या नाहीत आणि यांनी 60 जागा लढवून 5 जागा जिंकल्या. बाकीच्या जागेवर कोण जिंकले? सांगा कांग्रेस वाल्यांनो. तुम्ही केलेल्या अन्यायाचा पाढा मी नेहरूपासून ते मनमोहन सिंगपर्यंत द्यायला तयार आहे. मला दोन मिनिटे द्या, तुम्हाला चुल्लुभर पाण्यात जीव द्यावा लागेल. अशा शब्दात हल्लाबोल करत  एमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसींनी तोफ डागली आहे.

ही बातमी वाचा :