एक्स्प्लोर

Anna Hazare : अरविंद केजरीवाल स्वार्थी, शुद्ध आचार विचार, त्याग करणाऱ्याला मतदान करा; ऐन मतदानाच्या दिवशी अण्णा हजारेंचा हल्लाबोल

Anna hazare on Arvind Kejriwal : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत असतानाच अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

Anna hazare on Arvind Kejriwal : दिल्लीत आज बुधवारी (दि. 05) विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Vidhan Sabha Election 2025) मतदान पार पडत आहे. भाजप (BJP), आम आदमी पार्टी (AAP) आणि काँग्रेस (Congress) असा तिरंगी सामना या निवडणुकीत आहे. दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागा असून 699 उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीत 13 हजार 766 मतदान केंद्र बनवण्यात आली असून 1.56 कोटी मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. आता दिल्लीत मतदान पार पडत असतानाच सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी आम आदमी पार्टी (आप) चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 

केजरीवाल पूर्वी तो चांगला होता म्हणून माझ्यासोबत होता, मात्र ज्या दिवशी पक्ष आणि पार्टीच्या नादात केजरीवाल स्वार्थी झाला, तेव्हाच त्याच्या पासून मी दूर झालो, असा हल्लाबोल अण्णा हजारे यांनी केला आहे. लोकांनी आता शुद्ध आचार विचार आणि जीवनात त्याग करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. 

नेमकं काय म्हणाले अण्णा हजारे?  

अण्णा हजारे म्हणाले की, सुरुवातीला अरविंद केजरीवाल माझ्यासोबत होता, तेव्हा त्याची नियत साफ होती. तेव्हा मला वाटले की, हा एक चांगला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी त्याला सोबत घेतले होते. मात्र पक्ष आणि पार्टी जेव्हा काढली तेव्हापासून मी त्याची साथ सोडली. मला समजलं की हा स्वार्थी आहे.  सुरुवातीला मला तो चांगला वाटला होता, त्याचे आचार विचार चांगले होते. त्याच्या डोक्यात पक्ष आणि पार्टी नव्हती. मात्र, आता हेच दारूबाबत बोलत आहेत. दारूसाठी आम्ही आंदोलन केले होते त्यावेळी ते देखील आमच्यासोबत होते. आता तेच दारूबाबत बोलत आहेत त्यामुळे मी त्याला सोडून दिले. काही लोक सांगतात की, अण्णा हजारे यांच्यामुळे हे आलेत. मात्र, ही गोष्ट चुकीची आहे. सुरुवातीला तो चांगला माणूस होता, नंतर मला जेव्हा समजलं तेव्हा मी त्याच्यापासून दूर झालो, असा हल्लाबोल अण्णा हजारे यांनी केलाय.  

अण्णा हजारेंचे मतदारांना आवाहन

दिल्लीत आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. यावरून अण्णा हजारे यांनी मतदारांना आवाहन केले आहे.  जो उमेदवार आहे, त्याचे चारित्र्य कसे आहे? त्याचे आचार-विचार कसे आहेत? त्याचे जीवन कसे आहे? हे पाहूनच मतदान करा, असे आवाहन त्यांनी दिल्लीतील मतदारांना केले आहे. 

आणखी वाचा 

'नवी दिल्ली' मतदारसंघात कोण वरचढ? अरविंद केजरीवाल जिंकणार का? राजधानीला मुख्यमंत्री देणाऱ्या मतदारांच्या मनात नेमकं काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका

व्हिडीओ

Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन
Sanjay Raut PC :  राजकारणात गुलामांचा बाजार, अजितदादांना महायुतीतून बाहेर पडावं लागणार- संजय राऊत
Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!
Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
ठाकरेंना जय महाराष्ट्र, कट्टर शिवसैनिक अन् माजी आमदाराचा भाजप प्रवेश; सांगलीत राजू शेट्टींनाही 'दे धक्का'
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
'सरकारविरुद्ध निर्णय दिल्याबद्दल न्यायमूर्तींची बदली योग्य नाही,' न्यायमूर्तीं उज्ज्वल भुयान यांची कॉलेजियम व्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर उघड टीका
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
महायुतीचा ZP लाही बिनविरोध पॅटर्न जोरात; जिल्हा परिषदेत 5 अन् पं. समितीला 6 उमेदवार विजयी, भाजपचे किती?
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
सहरच्या 'हरा कर देंगे' वक्तव्यावरुन आम्ही मागे हटणार नाही; जलील यांचा मुंब्य्रातून फुल सपोर्ट, राणे, सोमय्यांवरही टीका
Pakistan : आयसीसीनं बांगलादेशवर अन्याय केला, ...तर आम्ही देखील टी 20 वर्ल्ड कप खेळणार नाही, मोहसीन नक्वींचं वक्तव्य
बांगलादेशवर अन्याय होतोय, पाकिस्तान सरकारनं आदेश दिल्यास वर्ल्ड कप खेळणार नाही : मोहसीन नक्वी
तीन अपत्य असल्याचा भाजप उमेदवारावर आक्षेप, कराडच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरवला, साताऱ्यातील अपक्ष उमेदवाराची हायकोर्टात धाव 
तीन अपत्य असल्याचा भाजप उमेदवारावर आक्षेप, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरवला, साताऱ्यातील अपक्ष उमेदवाराची हायकोर्टात धाव 
Embed widget