मुंबई : अंधेरी पूर्व  विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Bypoll Election) उद्या मतदान होणार आहे.  या अंधेरी पोटनिवडणुकीवरून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यातून अखेर उद्या  मतदान होतंय आणि 6 नोव्हेंबरला  निकाल लागणार आहे. या निवडणुकीत उमेदवार रिंगणात आहेत. 


अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरी येथे पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उभ्या राहिल्या. तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप व शिवसेना बाळासाहेबांची या गटाचा सामना होणार होता. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. यात निवडणूक कोण जिंकणार यावरून दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोप देखील पाहायला मिळत होते.


 या पोटनिवडणुकीत चुरस निर्माण झाली असताना राज्यात पोटनिवडणुकांमध्ये एखाद्याच्या घरी दुखावटा असेल तर उमेदवार उभा करू नये , ही आपली संस्कृती नाही दिलेला उमेदवार मागे घ्या अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला केली. यानंतर भाजपने आपल्या पक्षश्रेष्ठींशी आणि नेत्यांची चर्चा केल्यानंतर आपला उमेदवार मागे घेतला.


संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. ठाकरे गटाच्या उमेदवाराचा नोकरीचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप झाला. तर राजीनामा मंजूर करण्यासाठी उच्च न्यायालयात जावे लागले होते. यानंतर कोर्टाने त्यांना राजीनामा पत्र देण्यास पालिकेला कळवले.


राज ठाकरे यांच्यासह लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे यासाठी विविध राजकीय पक्षांनी भाजपला केलेली विनंती . यांनतर भाजपने घेतलेली माघार या सगळ्या प्रकारामुळे अंधेरी पोट निवडणुकीत चांगलीच रंगत आली. मात्र भाजप आपली हार होणार या भीतीपोटी त्यांनी माघार घेतली. मतदान तोंडावर असताना नोटाचा पर्याय वापरा असे भाजपकडून प्रचार करण्यात येते असा आरोप देखील उद्धव ठाकरे गटाने केला


या निवडणूक रिंगणात असलले उमेदवार



  • ऋतुजा लटके – शिवसेना

  • बाला नाडार – आपकी अपनी पार्टी (पिपल्स)

  • मनोजकुमार नायक – राईट टू रिकॉल पार्टी

  • निना खेडेकर – अपक्ष

  • फरहान सय्यद – अपक्ष

  • मिलिंद कांबळे – अपक्ष

  • राजेश त्रिपाठी – अपक्ष हे असणार आहेत.


अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून राजकारण पाहायला मिळाले . यामध्ये आता महत्त्वाचा टप्पा मतदानाचा पार पडतोय. याची तयारी देखील जिल्हाधिकारी प्रशासनाने जोरदार केली आहे. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर उद्या मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत इतर अपक्ष व काही संघटनांचे एकूण सहा उमेदवारांसह शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्याबरोबर सामना आहे. या निवडणुकीत ऋतुजा लटके यांच या निवडणुकीत पारड जड आहे. कारण रमेश लटके यांच्या निधनानंतर सहानुभूती आणि रमेश लटके यांचे काम हे या मतदारसंघात आहे. त्यामुळे मतदान पार पडल्यानंतर निकाल देखील लवकरच येणार आहे. आणि अंधेरी पोटनिवडणुकीचा नवा आमदार कोण हे सर्वांसमोर येणार आहे.