Amravti Election Reservation 2022 : अमरावती महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं आज आरक्षण सोडत जाहीर केली. राज्‍य निवडणूक आयोगाच्‍या आदेशानुसार, आगामी महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि सर्वसाधारण महिलांसाठीचे आरक्षण सोडतीद्वारे (ड्रॉ) निश्चित करण्यात आलं. त्यासाठीचा कार्यक्रम मनपाच्या निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आला होता.  


अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील महिलांकरिता


प्रभाग क्र. 11, 12, 13, 14, 15 मधील अ जागा, प्रभाग क्र. 23, 28, 31, 33 मधील अ जागा अनुसूचित जाती प्रवर्गातीली महिलांकरिता आरक्षित करण्यात आला आहे. 


अनुसूचित जमाती (ST) महिला प्रवर्गातील आरक्षित जागा


अमरावती महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्र. 10 अनुसूचित जमातीली महिला प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. 


सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित जागा


प्रभाग क्र. 1 मधील ब, प्रभाग क्र. 2 मधील ब, प्रभाग क्र. 3 मधील अ आणि ब, प्रभाग क्रमांक 4, 5, 6, प्रभाग क्र. 7 मधील अ आणि ब, प्रभाग क्र. 8, 9 आणि 11 मधील ब, प्रभाग क्र. 13, 14, 15 मधील ब, प्रभाग क्र. 16, 17 मधील अ आणि ब, प्रभाग क्र. 18, 20, 24 अ, प्रभाग क्र. 19, 21, 22, 25, 29 मधील अ आणि ब प्रभाग क्र. 23, 27, 28, 30, 31, 32 मधील ब सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित करण्यात आला आहे. 



महापालिकेची प्रभागनिहाय रचना 


अमरावती महापालिका निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनं (तीन नगरसेवकांचा एक प्रभाग) होणार आहे. अमरावती शहराचे एकूण 33 प्रभाग असून त्यापैकी 32 प्रभागांत तीन नगरसेवक तर एका प्रभागांत दोन नगरसेवक असतील. एकूण 98 नगरसेवक मनपा आमसभेत निवडून जाणार असून त्यापैकी 49 जागा महिलांसाठी राखीव आहेत. 


एकूण 98 सदस्‍यां पैकी 17 जागा अनुसूचित जातीसाठी तर 2 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. यात एससी महिलांसाठी 9 तर एसटी महिलांसाठी 1 जागा आरक्षित आहे. सर्वसाधारण महिलांसाठी एकूण 39 जागा आरक्षित असून त्‍यापैकी 30 जागा राज्‍य निवडणूक आयोगाद्वारे थेट आरक्षित करण्‍यात आल्या आहेत. उर्वरित 9 जागा सर्वसाधारण महिला सदस्‍यांकरिता ईश्‍वर चिठ्ठीनं आरक्षित करण्यात आल्या.