Ambadas Danve : छत्रपतीसंभाजीनगर :राज्यातीलमहापालिकानिवडणुकीच्यानिकालाअंतीबहुतांशठिकाणीभाजपचंच कमळ फुलल्याचेचित्रआहे. तरदुसरीकडे 25 वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation Election Result 2026) भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावलीय. तब्बल 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात. त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार, हेआताजवळजवळ स्पष्ट झालं आहे.
दुसरीकडे, बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शिवसेनेला त्यांचा गड देखील राखता आला नाहीये. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत (Chhatrapati Sambhajinagar Muncipal Corporation Election Result) ठाकरे गटाने 94 जागांवर उमेदवार दिले होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाला दोन आकडी विजयही मिळवता आलेला नाही. ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ सहा जागा मिळाल्या आहेत. यात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनाही भावाच्या पराभवामुळे फटका बसल्याचा दिसून आलंय. यासर्वपार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनीसमाजमाध्यमांवरएकभावनिकपोस्टकरतभाष्यकेलंय. अंबादास दानवे यांनी राज ठाकरेआणि उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा एक फोटो आणिव्हिडीओशेयरकेलाय. यावरआपलेचफितूरनिघालेतरीशेवटच्याश्वासापर्यंतलढूअसंलिहलंआहे. ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची हि पोस्ट सध्याचर्चेतआलीआहे.
Ambadas Danve on BJP : पैशाची वृष्टी भाजपच्या आकाशातून झाली. धो-धो पैशाचा पाऊस झाला
एकीकडे बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचा गड राखता आला नाही. दुसरीकडे शिंदे गटाला ही छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 जागाच मिळाल्या असून भाजपने बहुमताचा आकडा गाठल्याचा चित्र आहे. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणालेकि, पराभव मान्य केला पाहिजे. 35 ठिकाणी आम्ही दुसऱ्या क्रमांकावर राहिलो आहे. आमचे 7 ठिकाणी विजय झाले. आम्ही प्रचार चांगला केला होता, मात्र पैशाची वृष्टी भाजपच्या आकाशातून झाली. धो-धो पैशाचा पाऊस झाला. 14 तारखेला 25 टक्के मतदान झाल्याची घटना घडली, अशी तक्रार आहे. मतदान रीसेट झाले अशीही तक्रार झाली आहे. या शहराला भाजपने पाणी दिले नाही, तरी जनतेने भाजपला निवडून दिले आहे. जनतेच्या मनात काही असेल तर शुभेच्छा, असेहीअंबादासदानवेम्हणाले.
Ambadas Danve : हरलो हे आमचे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे दुर्दैव
मात्र, सत्तेपुढे शहाणपण टिकत नाही, हे सत्य आहे. हरलो हे आमचे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे दुर्दैव आहे. यांच्याकडे सर्व उपलब्ध असताना ते 11,12 पर्यंत पोहोचविले. आम्हला संपविले मात्र त्यांचे जे कलीग आहे. त्यांना तरी संपवायला नको होतं. येणाऱ्या काळात निवडून आलेले 70 लोक मुंबईला दिशा देतील. आमचे सगळे गेले तरी आम्ही 70 जगा जिंकल्या. हे काही कमी नाही. असेहीतेम्हणाले.
