मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सर्व सात टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. मतदानानंतर सर्व वाहिन्यांचे (चॅनेल)आणि एजन्सींचे एक्झिट पोल समोर आले आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोल्समध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. 'एबीपी न्यूज'-'नेल्सन' यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्येदेखील देशामध्ये एनडीएला बहुमत मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


एनडीए सरकार स्थापन करेल असे सर्व पोल्समध्ये दिसत असले तरी अर्ध्याहून अधिक एक्झिट पोल्समध्ये 2014 च्या लोकसभेप्रमाणे एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत नसल्याचे समोर आले आहे. सर्व पोल्सची सरासरी काढली तर स्पष्ट होते की, एनडीए बहुमत सिद्ध करुन सत्ता स्थापन करेल. सर्व वाहिन्या आणि एजन्सींच्या एक्झिट पोल्सची सरासरी काढली तर एनडीएला 291 युपीएला 125 आणि इतर पक्षांना 124 जागा मिळतील.

चॅनेल-एजन्सी        एनडीए       यूपीए       इतर

एबीपी-नेल्सन         277           130        127

टीव्ही9-सी वोटर    287           128        127

रिपब्लिक टीव्ही     305           124         113

इंडिया टुडे            306            132        104

न्यूज नेशन            290            118        130

सरासरी                292            126        120

------------------------------------------------

एबीपी-नेल्सनचे एक्झिट पोल 

एकूण जागा (542)

▶️एनडीए - 277
▶️यूपीए - 130
▶️इतर - 135

-------------------------------

महाराष्ट्र (48) 
▶️महायुती - 34
▶️महाआघाडी - 14

पक्षनिहाय अंदाज
शिवसेना - 17
भाजप - 17
काँग्रेस - 04
राष्ट्रवादी - 09
स्वाभिमानी - 01

उत्तर प्रदेश (80) 
एनडीए - 33
यूपीए - 2
सपा-बसपा - 45

गुजरात (26) 
एनडीए - 24
यूपीए - 02

राजस्थान (25)
एनडीए - 19
यूपीए - 06

बिहार (40)
एनडीए - 34
यूपीए - 06

छत्तीसगड (11)
एनडीए - 06
यूपीए - 05

उत्तराखंड (05)
एनडीए - 04
यूपीए - 01

मध्यप्रदेश (29)
एनडीए - 24
यूपीए - 05

प.बंगाल (42)

एनडीए - 16
तृणमूल - 24
यूपीए - 05

Exit Poll 2019 Maharashtra : महायुतीला फटका, महाआघाडीच्या काहीच जागा वाढणार 




Exit Poll 2019 Uttar Pradesh (UP): उत्तर प्रदेशात एनडीएला मोठा धक्का, महागठबंधनची महामुसंडी