Akola News : अकोल्यातील एमआयएमच्या सभेत झालेल्या राड्याला जबाबदार असणाऱ्या आयोजक आणि पोलिसांवर कारवाई करा, अशीमागणी अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण (Sajid Khan Pathan) यांनीकेलीय. सोबतच भाजप आणि एमआयएमची स्क्रिप्ट एकच असल्याचा देखील आरोप त्यांनीकेलाय. रविवारी अकोल्यात खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी एमआयएमच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत मोठा राडा झाला होता. अकोला शहरातल्या गडंकी भागातील झुल्फिकार अली मैदानावर ही सभा झाली होती. गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्यानंतर पोलिसांनी गर्दीवर लाठीमार केला होता. आता या प्रकरणात दोषी असलेल्या पोलीस आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण (Sajid Khan Pathan) यांनी केलीये.
Sajid Khan Pathan: ओवैसी आणि भाजपची भाषा एकच, त्यांची स्क्रिप्ट एकाच ठिकाणावरून
दरम्यान, सभा ऐकण्यासाठी गेलेल्या निरपराध नागरिकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी आमदार साजिद खान पठाण यांनी केलीये. त्यासोबतच सभेच्या ठिकाणी योग्य नियोजन न करणाऱ्या एमआयएमच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीये. कालच्या सभेत असदुद्दीन ओवेसी यांनी अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांची शहरात दहशत असल्याचा आरोप केला होता. या आरोपवर बोलतांना साजिद खान पठाण यांनी ओवीसी यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आपण लोकांसोबत प्रेमाने वागतो, ही ओवेसी आणि भाजपला दहशत वाटत असल्याचं ते म्हणालेय. ओवैसी आणि भाजपची भाषा एकच आहे. त्यांची स्क्रिप्ट एकाच ठिकाणावरून येत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
