एक्स्प्लोर

Akola BJP : उमेदवारी नाकारल्याने भाजपमध्ये उद्रेक सुरूच! अकोल्यात भाजपच्या सरचिटणीसांचा राजीनामा, तर माजी सभापतींनी मागितलं पक्षाला उत्तर

Akola Election 2026 : उमेदवारी नाकारल्याने भाजपमध्ये उद्रेक सुरूच असल्याचे चित्र आहे. अकोल्यात भाजपात निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना तिकीट दिल्याने पक्षात उद्रेक पाहायला मिळतोये.

अकोला : राज्यभरात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. अशातच उमेदवारी नाकारल्याने भाजपमध्ये उद्रेक सुरूच असल्याचे चित्र आहे. अकोल्यात भाजपात निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना तिकीट दिल्याने पक्षात उद्रेक पाहायला मिळतोये. आता भाजपच्या (BJP) सरचिटणीसांनी थेट राजीनामा दिला आहे, तर माजी सभापतींनी तिकीट नाकारल्याप्रकरणी पक्षाला उत्तर मागितलेय.

गेल्या 30 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला अकाेला पश्चिम विधानसभामध्ये (Akola Municipal Corporation Election 2026) पक्षाचा पराभव झाल्यानंतर आता तिथेचं निवडणुकीत पक्षाअंतर्गत खदखद वाढत आहे. तिकीट नाकारल्यामुळे भाजपचे सरचिटणीस रमेश अलकरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. तर त्यांनी पत्राद्वारे खंत व्यक्त केलीय. दरम्यान, दुसरीकडे अकोला महापालिकेचे माजी सभापती सतीष ढगे यांनी देखील पक्षाला तिकीट नाकारल्याचं उत्तर मागितलंये.

Akola BJP : कायमच निष्ठावंताना डावललं अन् आयारामांना पायघड्या; सरचिटणीसांनी पत्रातून व्यक्त केली खंत

गेले 3 टर्मपासून भाजपकडं नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केलाय. प्रत्येकवेळी मला पुढील वेळी विचार करू, असे सांगत थांबण्याची सूचना दिल्या. अनेक नेतेमंडळींचा आदेश शिरसावंद्य म्हणून माझ्या इच्छुक उमेदवारीचा अर्ज मागे घेतला. पक्षाने सांगितलेल्या उमेदवारांना व पॅनलला निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतले आणि प्रत्येक वेळी निवडून आणले. यावेळी मी प्रभाग 10 मध्ये उमेदवारीसाठी अर्ज दाखल करून मुलाखत दिली होती. पक्षाने यावेळेस माझा विचार करू असे, मला सांगितले. पण दरवेळेसप्रमाणे याही वेळी माझी उमेदवारी नाकारण्यात आली. त्यासाठी कुठलेही पक्षाने मला ठोस कारण दिलेले नाही. एक कार्यकर्ता म्हणून मला हे कारण जाणून घेण्याचा निश्चितच अधिकार आहे.

पण कुठलेही सबळ कारण न देता किंवा काहीही न सांगता मला डावलण्यात आले. या सर्व प्रकारामुळ व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणाला व कायमच निष्ठावंताना डावलले गेले आणि आयारामांना पायघड्या घालण्याच्या प्रकाराला कंटाळून आजपासून पक्षाच्या संबंधित सर्व पदांचा राजीनामा देत आहे.

Akola News : पक्षाबद्दल मला कुठलाही आकस किंवा द्वेष नाही, पण...

भारतीय जनता पक्षाबद्दल मला कुठलाही आकस किंवा द्वेष नाही. आजही मनाने भारतीय जनता पक्षाचाच आहे, त्यामुळे मी कुठल्याही अन्य पक्षात जाऊन, जी सहज मिळू शकत होती ती उमेदवारी न घेता अपक्ष म्हणून ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. आज जरी स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी मला त्यांच्या राजकारणापायी सतत डावलले तरी प्रभागातील जनता मला बहुसंख्येने निवडून देईल, असा विश्वास त्यांनी पत्रातून व्यक्त केलाय.

महत्वाच्या बातम्या:

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Embed widget