अकोला :गेल्याच आठवड्यात भाजपनेअंबरनाथमध्येकाँग्रेससोबत आणि अकोल्यातली (Akola) अकोटमध्येएमआयएमसोबत युती केल्याने चांगलाच गदारोळ उठला होता. त्यानंतर, भाजपनेही BJP) या दोन्ही ठिकाणी संबंधित पदाधिकाऱ्यांनानोटीस बजावत कारवाई केली, तसेच अशी युती कदापि मान्य नसल्याचेही स्पष्ट केले. मात्र, अकोटमध्ये भाजप-एमआयएम युतीचा दुसरा अंक समोर आला आहे. 'एमआयएम'कडूनस्विकृतनगरसेवकपदी भाजपाच्या माजी नगराध्यक्षांचे पुत्र जितेशबरेठियायांना 'एमआयएम'च्या (MIM) पाचही नगरसेवकांनीसमर्थन दिलं. त्यामुळे, भाजप नेत्याच्या मुलालानगरसेवकहोण्यासाठी एमआयएमची मदत झाल्याने ही अप्रत्यक्ष युतीच असल्याचीचर्चाराजकीयवर्तुळातरंगलीआहे.
अकोलाजिल्ह्यतीलअकोटमध्येझालेल्या 'भाजप-एमआयएम' युतीवरून देशभरात मोठा गदारोळउडाला होताय. या 'अभद्र' युतीची बातमी सर्वात आधी 'एबीपीमाझा'ने दाखविली होती. या बातमीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही युती तोडण्याचे आदेश दिले. तर या युतीसाठी जबाबदार धरत स्थानिक आमदार प्रकाश भारसाकळे यांना भाजपने कारणे दाखवा नोटीस पाठवली. या सर्व घडामोडीनंतर एमआयएमभाजपच्यानेतृत्वाखालील 'अकोट विकास मंचा'तून बाहेर पडला होता. त्यानंतर एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी स्वत:चा गट स्थापन केला होता. मात्र, पहिल्या युतीने वाद झाल्यानंतर आज परत ही युती नव्याने वेगळ्या रूपात परत आली आहे.
नगरपालिकेत आज स्विकृत सदस्य निवडण्याच्या प्रक्रियेत परत 'भाजप-एमआयएम' युती वेगळ्या रूपात समोर आली. एमआयएमकडूनस्विकृतनगरसेवक पदासाठी एमआयएमकडून ताज राणा यांचं नाव आलं होतं. यासोबतचएमआयएमनेभाजपचे माजी नगराध्यक्षरामचंद्रबरेठिया यांचा मुलगा जितेन बरेठिया यांनाही उमेदवारी दिलीय. यात ताज राणा यांनी वेळ निघून गेल्यावर उमेदवारी दाखल केल्याचे कारण देत त्यांचा उमेदवारी अर्ज स्विकारण्यात आला नाही. त्यामुळे एमआयएमकडून एकमेव अर्ज आलेले भाजपचे जितेन बरेठिया हे एमआयएमचेस्विकृतनगरसेवक असतील. आता, एमआयएमचेस्विकृतनगरसेवक पदाचे उमेदवार ताज राणा कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, भाजपनेएमआयएमसोबत युती करण्यास कारणीभूत असलेले आमदार प्रकाश भारसाकळे आणि शहराध्यक्ष हरीश टावरीयांच्यावर अद्यापही कारवाई केली नाही. स्विकृतसदस्यामूळेअकोटमध्ये भाजप-एमआयएम युतीची परत नव्याने चर्चा सुरू झालीय.
दरम्यान, भाजप-एमआयएमच्या या पाठिंब्यावर आणि युतीवर काँग्रेस तीव्र शब्दात विरोध दर्शवला आहे. तसेच, भाजप आणि एमआयएम एकच आहे, असेही येथील काँग्रेस नेत्यांनी म्हटलं.
भाजप नेत्याला स्विकृतनगरसेवक पदासाठी समर्थन देणारे एमआयएमचे 5 नगरसेवक :
1) आफरीनअंजुमशरीफोद्दीन : गटनेता
2) दिलशादबीरज्जाक खा
3) रेशमापरविन मोहम्मद अजीम
4) डॉ. युसूफ खान हादीक खान
5) हन्नानशाहसुलतानशाह
