Akhil Chitre on Raj Thackeray, मुंबई : विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसलाय. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आणि वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे थोड्याच उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मातोश्रीवर अखिल चित्रे यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. अखिल चित्रे हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात मनसेकडून माजी आमदार तृप्ती सावंत (Trupti Sawant) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अखिल चित्रे नाराज झाले होते. दरम्यान, ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी अखिल चित्रे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. 


अखिल चित्रे काय काय म्हणाले? 


अखिल चित्रे म्हणाले, अठरा वर्षे मी मनसेमध्ये काम केलं. मात्र जो पक्ष ज्या विचारांसाठी सुरू झाला होता ते विचार बाजूला ठेवून हा पक्ष चालत आहे. त्यामुळे मी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेना  उमेदवार जिंकून आणण्यासाठी नाही, तर दुसऱ्याचा उमेदवार पाडण्यासाठी निवडणूक लढत आहे. राज ठाकरे म्हणाले होते की, मी दुसऱ्याचे लेकरं माझ्या अंगाखांद्यावर खेळवणार नाही, मग ज्या तृप्ती सावंत तीन-चार पक्ष बदलून आल्या.   त्यांना लगेच उमेदवारी देण्यात आली. ते देखील निवडून आणण्यासाठी नाही, तर दुसरे उमेदवार पाडण्यासाठी आहे. 






महायुतीत सोबत तृप्ती सावंत झिशान सिद्दिकी यांच्यासोबत बैठका घेतात आणि वरूण सरदेसाई यांना पाडण्यासाठी ते साथ देत आहेत. तृप्ती सावंत जिंकण्यासाठी लढल्या असत्या तर मी त्यांच्यासोबत असतो पण कोणालातरी पाडण्यासाठी तुम्ही जर निवडणूक लढवत असाल तर ते योग्य वाटत नाही.  आता आधीच्या पक्षाला ज्याला पाडायचं होतं त्याला मी पाडू देणार नाही ही जबाबदारी आता माझी आहे. वरुण सरदेसाई यांना जिंकून आणायची जबाबदारी आता माझी आहे. 


अखेर मला पक्षाबाहेर ढकलण्यात त्यांना यश आलं...  खंत एकंच की खंजीर समोरून नाही, मागून नाही तर शेजारी बसून खुपसला गेला... राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलं आहे सावध रहा.... असो, जय महाराष्ट्र!, अशी प्रतिक्रियाही चित्रे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या 


मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार